जळगांव – दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
अखिल भारतीय हिंदू महासभा जळगाव जिल्हाच्या वतीने दि.२८ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील टॉवर चौकातून सावरकर जयंती निमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबदा प्रमाणे सुमारे २८ वर्षा पासून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त मशाल रॅली काढण्यात येते तसेच सावरकरांचे तेजस्वी विचार लोकापर्यंत पोहोचावेत तसेच स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वाभिमानाने उभे राहून व राष्ट्रासाठी समर्पित होऊन राष्ट्रभक्ती स्वाभिमान व संस्कृती या प्रखर भावनेने या मशाल रॅलीचे आयोजन केले आहे.तरी सर्व सावरकर भक्त व हिंदुत्व निष्ठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दि.२८मे.रोजी सायंकाळी सहा वाजता टावर चौक जळगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.
या भव्य मशाला रॅलीला यशस्वी करण्यासाठी अ.भा.हिंदू महासभा जळगाव जिल्ह्याच्या वतीने ॲड.गोविंद तिवारी,विकास पाटील ,डॉ.रमाकांत कदम.देविदास भडांगर,रमेश सुशिर ,ॲड.भूषण सूर्यवंशी,नारायण अग्रवाल,मिलिंद नारखेडे,भरत कोचुरे,अजय पाटील,समाधान पाटील ,ॲड.प्रीतम पाटील,आदी.परिश्रम घेत आहेत.
अ. भा. हिंदू महासभा जळगाव जिल्हाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन..
RELATED ARTICLES
