जळगाव- आधुनिकतेच्या युगात मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि ढासळलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व उध्वस्त झालेल्या डोंगरदऱ्या यांचे संवर्धन होण्यासाठी पवन चॅरिटेबल ट्रस्ट व.अर्पण सेवा ट्रस्ट या संस्थे तर्फे सीड बॉल निर्मिती करण्यात येत आहे. पवन संस्थेतर्फे विविध दहा विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत सीडबॉल बनविण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे.
पर्यावरणाचे संवर्धन आणि जाणीव जागृती, मूल्य रुजवण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीकडून सेंद्रिय खत आणि शेणखत व विविध प्रकारच्या बियाण्याचे एकत्रीकरण व मिश्रण करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्यामध्ये उन्हात सुकवण्यात आले आहेत. खरीप हंगामाचा पाऊस सुरू होईपर्यंत हे बॉल सुरक्षित ठेवले जातील, ग्रामीण भागातील विद्यालयांमध्येसुद्धा हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
जूनमध्ये वनविभागाकडे सुपूर्द..
योग्य प्रकारे पाऊस झाल्यावर ओसाड माळ रानातही हे सिडबॉल पावसाळ्यात फेकले जाणार आहेत. माती मिश्रित असल्याने पावसाळ्यात सहज सीड बॉल मधील बी उगवते या सीड बॉलमुळे रोपांच्या लागवडीसाठी खोदण्यात येणारे खड्डे खोदण्याची गरज नसते या अनोख्या सीडबॉलचे फलित म्हणून पवन ट्रस्ट तर्फे विद्यार्थी 5000 सीडबॉल ची निर्मिती करून ते सामाजिक वनीकरण विभाग व वनविभागाकडे पेरणीसाठी जून महिन्यात देणार आहे.
सीड बॉल बनवण्याची साधी पद्धत..
पर्यावरण संवर्धनासाठी आणि बंजर जमिनीवर झाडी उगवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.लागणारे साहित्य-चिकणी माती,गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत, थोडी राख आणि विविध झाडांचे बियाणे एकत्र करून माती आणि खत समप्रमाणात एकत्र करा,त्यात थोडे पाणी शिंपडून मळून घ्या.या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे- लड्डू बनवा,प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी तीन ते चार बिया दाबा आणि गोळा पूर्णपणे बंद करा, हे गोळे सावली किंवा सुकवून ठेवा घ्या सीड बॉलचे फायदे- हे गोळे डोंगर,दुर्गम भाग किंवा मोकळ्या जागेत सहज फेकता येतात.माती आणि खतांचे आवरण असल्याने बियाणे कीटक किंवा प्रण्यांपासून सुरक्षित राहतात,अंकुरण पावसाळ्यात पाणी मिळताच बीज अंकुरित होऊन रोप वाढते,बोर,जांभूळ,चिंच,गुंज, सीताफळ, डोंगराची काळी मैना,आंबे,अंजीर,रामफळ ,वड, कडूनिंब,गुलमोहर,डोंगराची काळी मैना,पिंपळ, उंबर अशा विविध प्रकारच्या बिया मिळवून शेण व मातीचा वापर करून विद्यालयांत सीड बॉल तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
या उन्हाळी सुट्टीत प्रत्येक मुलाला काही सीड बॉल दिले जाणार आहे त्याचबरोबर बस थांबा, एसटी डेपो, रेल्वे स्थानक,संस्थांच्या कार्यालयात देखील हे बॉल पाठवले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पांमध्ये झाडांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे डोंगरदर्या उध्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग चे प्रमाण वाढले आहे.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज आहे.असे मत पवन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास नारखेडे यांनी व्यक्त केले.
पर्यावरण जागृतीचा प्रयत्न–
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे,जैवविविधता टिकावी, वृक्ष संवर्धन ही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे. यासाठी सीड बॉल निर्मितीउपक्रम राबविण्यात येत असल्याची रघुनाथ राणे यांनी सांगितले.पवन नारखेडे,रघुनाथ राणे,राजेश वाणी,जगदीश कुमार,महेंद्र पाटील, कुणाल जगताप मुकेश गायकवाड, लीलाधर नारखेडे ,संतोष सोनार, सुधाकर सबके,डॉ हरीश सोनार.चंद्रकांत पाटील, ओजस निकम इत्यादी या कामे सहकार्य करीत आहे.
घरच्या घरी सीड बॉल कसे बनवाल–
सीडबॉल बनवणे सोपे आहे विविध बियांमध्ये किती खत आणि चिकन माती जोडली जाईल याचा विचार केला पाहिजे. बऱ्याच वनस्पतींमध्ये पाच भाग काळी माती ते तीन भाग चिकन माती हा एक सामान्य नियम आहे पण निसर्गावर अवलंबून अंकुर येण्याचा कालावधी बदलत असला तरी ये बॉल उडवण्यासाठी वसंत ऋतू आणि उन्हाळा हा सर्वोत्तम कालावधी आहे पसरण्यास सोपे सीड बॉल त्यांच्या लहानशा आकारामुळे आश्चर्य कारकपणे जुळवून घेण्यासारखे आहे तुम्ही त्यांना कुंपणावर,निर्जन शेतात किंवा तुमच्या घरामागील अंगणात उडवू शकता.
भेटवस्तू म्हणून वापर करा —
प्रत्येक व्यक्तीसाठी घरगुती आणि कार्यक्रमांसाठी सिडबॉल हे आदर्श बाब आहे सीड बॉल भेट देणे एखाद्याच्या पहिल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी.
सीडबॉलचा उपयोग —
फुले विकसित करण्यासाठी बियाण्याचे गोळे सुद्धा वापरले जाऊ शकतात,मधमाशी परागीकरणासाठी प्रभावी ठरतात. पण वंचित घटकांना विविध प्रकारची फळे व रानमेवा मिळतो.
