जळगांव – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) )जळगांव शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्राह्मण समाजाच्या सेवेसाठी कार्यरत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि.१८ रोजी श्री परशुराम जयंती निमित्त आयोजित भगवान श्री परशूराम पालखी सोहळा शोभायात्रा समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने भव्य स्वरूपात उत्साहपुर्ण वातावरणात ढोल ताशांच्या गजरात,लयबध्द लेझीम नृत्य प्रदर्शन करीत जय परशुरामच्या जयघोषात साजरा झाला..सजवलेल्या पालखीतून तेजःपुंज भगवान श्री परशुराम मूर्ती विराजमान होवून समाज बांधवांच्या खांद्यांवर पुष्प वर्षावात मार्गस्थ होत होती. पालखी मार्गावर चैतन्यमय वातावरण पसरले होते.ठिकठिकाणी पालखीचे स्वागत होवून भगवान श्री परशुरामाचे पूजन केले जात होते.
या प्रसंगी श्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.तेथून ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे
उत्तम सादरीकरण करत ,माता भगिनी यांच्या ताल ठेका धरलेल्या नृत्य सहभागाने, टाळ मृदुंगाच्या गजरात श्री परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा मिरवणूक प्रेम नगरातील श्री सप्त शृंगी मंदिरात पोहचली.रस्त्यात ठिकठिकाणी घरोघरी श्री परशुराम पालखीचे श्रध्देने भव्य स्वागत केले जात होते..
मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री परशुराम पूजन सोहळा
या नंतर श्री सप्तश्रुंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात करण्यात आले.वेद पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेदमंत्रांचे पठण केले. या प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे प.पू.श्री दादा महाराज जोशी,जळगांव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने,उपमहापौर मनोज चौधरी,वेद पाठशाळा प्रमुख,श्री देवेंद्र गढीकर गुरुजी,हभप मुकुंद महाराज धर्माधिकारी,श्री.देवदत्त मोरदे महाराज ,श्रीराम महाराज जोशी,शिवसेना जिल्हा उपसंघटक मुरबाड तथा ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक सौ.अर्चना सुरडकर,भाजपा स्विकृत नगरसेवक सुभाष शौचे ,ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्ष रेखाताई कुळकर्णी, अजय कुळकर्णी, पालखी प्रमुख प्रसाद पटवे,संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ,कार्याध्यक्ष कमलाकर फडणीस व्यासपीठावर विविध क्षेत्रतील मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावरून श्री परशूराम जयंती निमित्त ब्रह्मश्री संस्थेतर्फे आयोजित भगवान परशूराम पालखी सोहळ्यात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना प. पू.श्री दादा महाराज जोशी यांनी सांगितले की ब्राह्मण समाज हा समाजाचा आरसा आहे..आदर्श आहे त्यांनी याचे भान ठेवून परिवारातील संस्कारा कडे कटाक्षाने लक्ष देवून योग्य असे आचरण केले पाहिजे,परिवार सक्षम,ज्ञानी,विनम्र सेवाभावी कसा होईल याकरता प्रयत्न केले पाहिजे सनातन धर्माचे पालन करून समाज संघटित होण्यासाठी कार्य झाले पाहिजे, ,आपसी भेदभाव न बाळगता, गटबाजी न करता समाज एकसंघ होण्यासाठी, सुरक्षित होण्यासाठी लक्ष देणे अपेक्षित असल्याचे तसेच धर्मरक्षण करण्यासाठी आपण सारे वचनबद्ध आहोत.त्या दृष्टीने पराक्रमी श्री परशुरामाचा आदर्श डोळ्या समोर ठेवून कार्य केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
समाजातील मुलींच्या सुरक्षितते साठी पालकांनी जागरूक रहावे – सौ.अर्चना सुरडकर.
आजचे स्थितीत रोज आपण ज्या घटना अनुभवीत आहोत त्या ऐकून आपल्या समाजातली पालक वर्गात भीती पसरत आहे.त्या संकटापासून वाचाण्यासाठी पालकांनी जागरूक राहून मुलींना मार्गदर्शन करून अश्या परिस्थितीत काय काळजी घ्यावी हे लक्षात आणून देणे,त्यांना धीर देणे,त्यांची भीती कमी करणे, त्यांना कायद्याचे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. आम्ही हा अन्याय या पुढे सहन करणार नाही,संघटनेचे माध्यमातून संघटित राहून याला मुहतोड जवाब दिला जाईल.मी व ब्राह्मण संघर्ष समिती त्या साठी तुमच्या पाठीशी आहे.तसेच परशुराम आर्थिक विकास मंडळ योजनांचा समाजातील सर्व गरजवंताला आवाहन करते की आपण त्या योजनांचा लाभ घ्यावा काही अडचण येत असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.ब्रह्मश्री संस्थेच्या कार्याची प्रशंसा करीत समाजाने अश्या कृतिशील संस्थेच्या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.
त्या नंतर इतर मान्यवरांनी आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत एकसुरात सामूहिक श्री परशुराम आरती करण्यात आली.
ब्रह्मश्री तर्फे समाजातील गुणवंतांचा सत्कार
याप्रसंगी व्यासपिठावर निमंत्रित तसेच ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ,गुलाबपुष्प देवून करण्यात आला.
शिस्तबद्ध महाप्रसाद वितरण
ब्रह्मश्री संस्थेतर्फे भगवान श्री परशुराम पालखी सोहळ्यात सहभागी समाज बांधवांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.या प्रसंगी ब्रह्मश्री संस्थेच्या महाप्रसाद वितरण समिती सदस्यांनी परिश्रम घेत अत्यंत शिस्तबद्ध ,सेवाभावी पद्धतीने हे कार्य यशस्वी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष कमलाकर फडणीस यांनी तर सूत्रसंचालन मिलिंद चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ यांनी केले.
या सर्व आयोजनाला यशस्वी करण्यांकामी संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ,संस्थापक महिला अध्यक्ष सौ.रेखा ताई कुळकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी प्रमुख प्रसाद पटवे,कार्याध्यक्ष कमलाकर फडणीस,डॉ.निलेश राव,दीपक कुलकर्णी गुरुजी,सुनिल कुळकर्णी,दीपक महाजन,प्रशांत कुलकर्णी सर,महेंद्र जोशी ,दीपक कुलकर्णी,प्रसाद निशाणदार,उल्हास जोशी,चित्तरंजन जोशी,मिलिंद चौधरी,राहुल कुलकर्णी (गोदावरी परिवार) सौ.भाग्यश्री राव, सौ.मेधा कुलकर्णी,सौ.सुषमा कीर्तने, सौ.शैला चौधरी,सौ संगीता भटमुळे,सौ.स्मिता चौधरी, सौ.मनाली डांगे,सौ.माधुरी कुळकर्णी,सौ.मृणाल मदाने ,संजीवनी व्यवहारे,सौ.धनश्री जोशी, सौ.जयश्री कुलकर्णी,सौ.वृंदा देशपांडे,यांनी परिश्रम घेतले.
