जळगांव – दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)रोटरी हॉल,गणपती नगर येथे संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत रोटरी क्लब जळगाव यांनी आपल्या ऑर्किड नेचर फाऊंडेशन,जळगावच्या सदस्याना वाचन कट्टा या कार्यक्रमासाठी आयोजन केले होते.
‘निसर्ग व पर्यावरण’या विषयावरील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली होती.ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी,सचिव सौ. सुनिता महाजन,वसंत सोनवणे,सौ.आरती कुलकर्णी, सौ.सोनवणे,उल्हास सुतार,सोमनाथ महाजन उपस्थित होते.तसेच रोटरीचे गिरीश कुलकर्णी,सौ.शुभदा कुलकर्णी,सौ.आदिती कुलकर्णी,साहेबराव पाटील ,सौ.संध्या आदी सदस्य उपस्थित होते.प्रत्येकाने एक पुस्तक घेऊन त्यातील एक परिच्छेद/पानाचे प्रकट वाचन केले.इतरांनी ऐकले.त्यामुळे वेगवेगळ्या पुस्तकांमधील विषयांबद्दल माहिती मिळाली.
त्यानंतर घरटी आणि परळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.रोटरीच्या सदस्यांना एकेक परळ देण्यात आले. शेवटी सुनीता महाजन यांनी आभार व्यक्त केले.अशा प्रकारे कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
