Monday, April 13, 2026
Homeजळगांव शहर"दिशा ऑप्टीकल" चा आज ३० वा वर्धापन दिन..ग्राहकांच्या सेवेतून उत्तुंग भरारी..

“दिशा ऑप्टीकल” चा आज ३० वा वर्धापन दिन..ग्राहकांच्या सेवेतून उत्तुंग भरारी..

जळगांव – दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) आज गोलाणी मार्केट स्थित व्यावसायिक दुकान “दिशा ऑप्टीकल”चा आज ३० वा वर्धापन दिन भांडारकर परिवारातर्फे ग्राहकांच्या विश्वास व विशेष सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत उत्साहात साजरा होत आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्राहकांनी ३० व्या वर्धापन दिनी दिशा ऑप्टिकल व भांडारकर परिवाराचे शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.“१२ एप्रिल १९९६” रोजी किशोरराव भांडारकर यांनी या ऑप्टीकल व्यवसायाची सुरुवात केली.गेल्या ३ दशकात असंख्य सन्माननीय ग्राहकांनी वेळोवेळी सेवेची संधी देवून जो विश्वास दाखवला त्याबद्दल सदैव ऋणी आहोत.आपले प्रेम,विश्वास व साथ या पुढे देखील आमच्या सोबत राहू द्या.आपल्या सर्वांची साथ ,आशीर्वाद लाभल्यामुळे इथ पर्यत हा प्रवास शक्य झाला.अश्या शब्दात “ग्राहक देवो भव:व सर्वोत्कृष्ट सेवा” या ब्रीद वाक्या सोबत एकनिष्ठता यापुढे देखील आपल्या सोबत नेहमी राहील एवढा विश्वास देतो.अशी प्रतिक्रिया त्यांनी धर्मसाथीशी बोलताना व्यक्त केली.सर्व सन्माननीय ग्राहक वर्गाचे मनपुर्वक आभार दिशा ऑप्टीकल गोलानी मार्केट,ई-विंग,८५ पहिला मजलाचे संचालक किशोर भांडारकर ,रोहन भांडारकर यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या