Tuesday, April 14, 2026
Homeजळगांव शहरश्री रुद्र लाल हनुमान मदिरात जन्मोत्सव उत्साहात साजरा..शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा...

श्री रुद्र लाल हनुमान मदिरात जन्मोत्सव उत्साहात साजरा..शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..

जळगाव- दि.३(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील बळीराम पेठ परिसरातील जागृतस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री रुद्र लाल हनुमान मंदिरातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शेकडो भाविक भक्तांनी या आयोजनाचा लाभ घेतला.श्री रुद्र लाल हनुमान मंदिरात पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव करण्यात आला.मंदिरात सुंदर अशी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.याप्रसंगी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.सकाळी अकरा वाजता मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आ.राजू मामा भोळे यांच्या शुभ हस्ते महाआरती

याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या शुभहस्ते महाआरतीचा प्रारंभ झाला तसेच माजी नगराध्यक्ष शिवचरण भैय्या ढंढोरे,प्रभाग क्रमांक ४ च्या भाजपा नगरसेविका सौ.शशिकला शिवचरण ढंढोरे,संदीप ढंढोरे,उदय भालेराव,राजेश यावलकर,मधुभाऊ महाजन ,मनोज घोरपडे,सुरेश दिवेकर,प्रदीप गुप्ता,नितेश पानसर,रमेश परदेशी यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली,या प्रसंगी देखील परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नंतर सकाळी ११.३० पासूनच महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला प्रारंभ झाला.टेबल खुर्चीची व्यवस्था श्री रुद्र लाल हनुमान मंदिराच्या सेवा समिती तर्फे करण्यात आली होती.प्रदीप गुप्ता परिवारा तर्फे गरम जिलबी भाविक भक्तांना या महाप्रसादात वितरित करण्यात येत होती.शेकडो भाविकांनी या महाप्रसाद सेवेचा लाभ घेतला.ह्या महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी श्री रुद्र लाल हनुमान मंदिर सेवेकरी समितीच्या व आयोजन समितीचे संदिप ढंढोरे, सुरेश दिवेकर,प्रदीप गुप्ता,भावेशकुमार पानसर ,बन्सी डाबोरे,राहुल घोरपडे, ,सुनिल ढंढोरे,सुभाष बेंडवाल,नितेश पानसर,रोहित बेंडवाल,आशितोष ढंढोरे,चंद्रविर ढंढोरे,हर्षल ढंढोरे, शंकर डाबोरे,,दीपक यादव,राजवीर ढंढोरे,विजय अटवाल,मनोज जयराज,पुष्कर ढंढोरे, बन्टी कंडारे,उमेश गोयर,जयंत ढंढोरे,रमेश परदेशी,धृव लोट,जगू गवळी, नारायण गवळी ,यांचेसह अनेक कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या