Tuesday, March 3, 2026
Homeजळगांव शहररोटरी क्लब ऑफ स्टार व धर्मरथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने..शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या...

रोटरी क्लब ऑफ स्टार व धर्मरथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने..शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी सेवाभावी उपक्रमातून’ऑर्थोपेडिक लायब्ररी’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न ..

जळगांव-दि.२७(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)रोटरी क्लब ऑफ स्टार व धर्मरथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी सेवाभावी उपक्रमातून’ ऑर्थोपेडिक लायब्ररी’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.ज्या रुग्णांचे ऑपरेशन झाले आहे किंवा जे गंभीर स्थितीत आहेत,अशा गरजू रुग्णांना या लायब्ररी मार्फत विविध साहित्य तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.या सामाजिक सेवा उपक्रमातून विविध ऑर्थोपेडिक साहित्य:व्हीलचेअर व वॉकर,सेमी फोलर बेड व वॉटर बेड,टॉयलेट सीट,वेस्ट बेल्ट व नी बेल्ट इ.उपलब्ध करून देण्यात आले आहे.या स्तुत्य उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरीयन ज्ञानेश्वर शेवाळे प्रांतपाल 3030,विनायक पाटील अध्यक्ष-धर्मरथ फाउंडेशन,सचिन जेठवाणी,सागर मुंडला,विपुल पटेल, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे,उत्तम शिंदे,संतोष पाटील,अंकुश कोळी,महेश चौधरी,भगवान सोनवणे ,दिलीप नाझरकर,विजय जगताप,विजय बांदल,अकिल पटेल,कामिल दादा,हितेश सुराणा,अनमोल मलिक ,हर्षल राजपूत,अनिकेत पोळ मान्यवर तसेच परिसरा तील नागरिक बंधू-भगिनींची उपस्थित होते.धर्मरथ फाउंडेशन तर्फे परिसरातील नागरिकांना रुग्णांकरता या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या