Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरभारत विकास परिषदेतर्फे जळगावात १ मार्च रोजी महादिव्यांग शिबिर ...

भारत विकास परिषदेतर्फे जळगावात १ मार्च रोजी महादिव्यांग शिबिर कृत्रिम मॉड्युलर पायाचे होणार मोफत वितरण..

जळगाव – दि.२८ धर्मसाथी मीडिया नेटवर्क भारत विकास परिषद जळगाव शाखा व भारत विकास परिषदेच्या पुणे येथील दिव्यांग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १ मार्च रोजी ५०० दिव्यांग व्यक्तींना शिबिरात कृत्रिम मॉड्युलर पायाचे मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त व दिव्यांग केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी प्रकल्प प्रमुख तुषार तोतला, विशाल चोरडिया, जळगाव शाखेचे सचिव डॉ. अनुपम दंडगव्हाळ, कोषाध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने यांची प्रमुख उपस्थिती होती.या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रात कायमस्वरूपी पुणे येथे भारत विकास परिषदेच्या दिव्यांग केंद्रातून गेल्या २५ वर्षांपासून अखंडपणे कार्य सुरू असल्याचे सांगितले.या केंद्राद्वारे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात. गेल्या वर्षी एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम होऊन त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असल्याचे त्यांनी सांगितले.जळगाव येथील या शिबिरासाठी पुण्याच्या रॉकेट सॉफ्टवेअर कंपनीने सीएसआर अंतर्गत आर्थिक सहकार्य केलेले आहे.या आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची ५० हजारांपेक्षा जास्त किंमत असून ते मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे. हे वजनाला अत्यंत हलके असून दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे, शेती काम करणे इत्यादी प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात असे खटावकर यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.या शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणे गरजेचे असून त्यासाठी चौधरी (8308478624), नायर (7588478624) किंवा संपर्क फाउंडेशन ४२,गांधीनगर जिल्हा पेठ कांताई सभागृहा जवळ जळगाव येथे संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.आभार प्रकल्प समन्वयक चिन्मय खटावकर यांनी मानले. याप्रसंगी भारत विकास परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विकास चौधरी, प्रसन्न मांडे,उल्हास सुतार,भूषण गुरव,राजी नायर यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या