Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरब्रह्मश्री संस्थेतर्फे आज समाज प्रबोधन करणाऱ्या " अवघे विश्वची माझे घर '..व्याख्यानाचे...

ब्रह्मश्री संस्थेतर्फे आज समाज प्रबोधन करणाऱ्या ” अवघे विश्वची माझे घर ‘..व्याख्यानाचे आयोजन.. ह.भ. प.डॉ.योगेश्वर उपासनी यांचे मार्गदर्शन..

जळगांव – दि.२५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) ब्रह्मश्री बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आज रविवारी दि.२५ रोजी दुपारी ४ वाजता शहरातील आप्पा महाराज समाधी येथे समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या कार्यक्रमात ब्राह्मण समजतील नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहेसर्व समाज बांधव यांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले असून ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थे तर्फे ह.भ.प.डाॅ.योगेश्वर महाराज उपासनी यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.व्याख्यानाचा विषय “अवघे विश्वची माझे घर’ हा आहे.अतिशय मार्मिक भाषेत आपल्या रसाळ वाणीतून श्री सदगुरु अप्पा महाराज समाधी मंदिर जळगाव येथे ह.भ.पा.योगेश्वर महाराज उपासनी हे उपस्थितांना या समाज प्रबोधनपर व्याख्यानातून मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.राष्ट्रीय कीर्तनकार महणून त्यांची ख्याती आहे.आक्रमक शैलीतून समाजा तील अन्याया विरुद्ध ते परखड विचार मांडत असतात.तरी सर्व समाज बांधवांनी व्याख्यानाचा लाभ परीवारा सह घ्यावा असे आवाहन ब्रह्मश्री संस्था व सर्व शाखिय ब्राह्मण समाज जळगाव वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या