
जळगांव – दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
दि.२६ रोजी श्री साईबाबा मंदिर पाळधी येथील ब्रह्मोत्सवात भव्य अन्नदानाचा कार्यक्रम भाविकांच्या विक्रमी गर्दीत पार पडला.पाळधी परिसरातून जवळ पासच्या खेड्यातील तसेच शहरातील भाविकांची मोठी उपस्थितीने ह्या वर्षी गर्दीचा उच्चांक मोडला.त्या ठिकाणी केमिस्ट बांधवांच्या सहयोगाने सेवाकार्यात हातभार लावण्यात आला.
दरवर्षी या धार्मिक उपक्रमात सामाजिक सेवेची अभिरुची केमिस्ट बांधवा मध्ये वाढीस जावी या हेतूने जळगाव जिल्हा केमिस्ट संघटना जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या आवाहन नुसार सेवेचे योगदान देत असते.
यावर्षी देखील अन्नदान वितरण कार्यात आपली मदत सर्व केमिस्ट बंधू व सर्व झोन प्रमुख यांनी ६ क्रमांकाच्या भोजन विभागातून (टेबल) वरून दि.२६ शुक्रवार रोजी दुपारी ३.३० वाजता स्थळावर पोहचून सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाळधी येथील साई बाबा मंदिरात आयोजित ब्रह्मोस्त्वात आत्मीयतेने सेवा दिली.
श्री साई बाबा मंदिर देवस्थान,ब्रहमोस्तव समिती तर्फे केमिस्ट संघटनेच्या सेवाभावी कार्याचे आभार मानण्यात आले.केमिस्ट व्यवसाय सोबत आपल्या हातून समाजाची सेवा घडली पाहिजे सामाजिक ऋण आपण डफेडले पाहिजे.यातून मिळणारा अनुभव मौलिक असतो या उपक्रमात सहभागी झालेले केमिस्ट भाग्यवान आहेत.असे मत त्यांनी धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केले.
पाळधी येथील श्रीसाई बाबा मंदिराच्या ब्रह्मोत्सव महाअन्नदान वितरण कार्यात..केमिस्ट संघटनेचा सेवेला हातभार..
RELATED ARTICLES
