
जळगांव – दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) हिंदू धर्मात नवीन लग्न झालेल्या मुली ५ वर्ष मंगळागौरीची पूजा करीत असतात.श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पूजा केली जाते.मंगळागौरीच्या पूजेला १६ दिवे,१६ प्रकारचे धान्य,फुले,पत्री वाहून व ५ लग्न झालेल्या मुलींना पूजेला बोलवून त्यांच्या सोबत पूजा केली जाते. समवयस्क मैत्रिणीं सोबत पूजा करून,गप्पा गोष्टी करत,गाणे व खेळ खेळत मंगळागौर जागवित असतात.
पूर्वी लहान वयात मुलींचे लग्न होत असत. घरीच स्वयंपाक घरातील साहित्य वापरून मंगळागौरीचे खेळ खेळले जायचे ,कालांतराने मुली नौकरी करू लागल्या,आता हॉल भाड्याने घेऊन व बाहेरून मंगळागौर खेळणाऱ्या ग्रुपला बोलवण्यात येऊ लागले ,ह्यात झिम्मा,वेगवेगळ्या प्रकारच्या फुग् ड्या,टिपरी नृत्य,नौका,पिंगा,गोफ,असे विविध प्रकारचे बरेच खेळ खेळले जातात, ह्या सर्व खेळांमुळे शरीराला छान व्यायाम मिळतो.विविध प्रकारचे समाजिक, पर्यवरणावर जनजागृती करणारे, तसेच विनोदी चालू घडामोडीवर उखाणे घेतले जातात.
सुरभी ग्रुप हा गेल्या १५ वर्षांपासून मंगळागौरचे खेळ खेळत आहे,एक दीड महिना अगोदर पासून प्रॅक्टिसला सुरवात होते. अध्यक्षा सौ स्वाती संजय कुलकर्णी असून निवेदन ही करतात,सुमधुर आवाजातिल गायिका सौ रोहिणी कुलकर्णी गाणे गातात. सौ प्रतीक्षा मोहरील, सौ.मेघा नाईक, सौ.स्वाती विजय कुलकर्णी,सौ पल्लवी मोहरील, सौ अविता जोशी , सौ.पल्लवी कुळकर्णी सौ प्रणिता कुळकर्णी अशा एकूण ९ जणी ह्या मंगळागौरीचे खेळ खेळतात.मिळालेल्या मानधना मधून महिलांना सुद्धा उदयोग मिळतो, काही रक्कम खेळणाऱ्या ग्रुपमध्ये वाटली जाते. व काही रक्कम समाजिक कार्यक्रमांसाठी वापरली जाते.
