Sunday, February 22, 2026
Homeजळगांव शहरश्री हनुमान चालीसा पठण स्पर्धेत १८२५ विद्यार्थी सहभागी..मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्याना...

श्री हनुमान चालीसा पठण स्पर्धेत १८२५ विद्यार्थी सहभागी..मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्याना पारितोषिके वितरित..

जळगांव – दि २१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव जिल्हा केमिस्ट संघटना अध्यक्ष केमिस्ट भूषण सुनिल भंगाळे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि.२१ रोजी सकाळी ९.०० वा.लेवाभवनात भव्य स्वरुपात शालेय विद्यार्थ्यां साठी श्री हनुमान चालीसा पठण स्पर्धा युवा विकास फाँडेशन व विष्णूभाऊ भंगाळे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सकाळी दिप प्रज्वलन व हनुमान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी ह.भ.प.श्री.दादा महाराज जोशी, प.पु.शास्त्री गोविंद स्वामी,प.पु.अतुल भगत,रामदास भंगाळे,माजी महापौर नितीन लढ्ढा,सत्कार मूर्ती सुनिल भंगाळे,अनिल झंवर ,शामकांत वाणी,डॉ.स्नेहल फेगडे, प्रा.डॉ.प्रशांत वारके,डॉ.ऋषिकेश बऱ्हाटे,जगन्नाथ किनगे ,शामकांत भंगाळे,महेश पाटील,कुंदन काळे, हर्षल मावळे,राज भंगाळे,सिद्धी भंगाळे,दिनेश मालू, पंकज पाटील,ब्रिजेश जैन यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी दादामहाराज यांनी आशिर्वाद देतांना सांगितले की विष्णू भाऊ भंगाळे यांनी हनुमान चालीसा पठण स्पर्धा आयोजनाचे हे ११ वे वर्ष असुन शालेय विद्यार्थ्याना संस्कार व आपल्या संस्कृतीचा पाया असणारे धार्मिक स्तोत्र पठणातून पाठांतराची गोडी लागावी या हेतूने तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बल,विद्या,बुद्धीचे दैवत असलेल्या श्री मारुती रायाचे हनुमान चालीसा विद्यार्थ्यांनी दररोज वाचणे,म्हणणे,गरजेचे आहे,
यामुळे बुद्धी आणि कार्यक्षमता वाढत असल्याने ही स्पर्धा दरवर्षी विशेष महत्व देवून केमिस्टभूषण सुनिल भंगाळे यांच्या वाढदिवसा निमित्त भरवण्यात येते.व शालेय विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी होतात.सर्व विद्यार्थ्यांकडून सामुहिक हनुमान चालीसा म्हणून घेतली. व हनुमानाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी आपल्या शुभेच्छा देतांना केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात संघटनात्मक व सामाजिक कार्य करणारे जळगांव जिल्हा केमिस्ट संघटना अध्यक्ष केमिस्ट भूषण सुनिल भंगाळे यांच्या वाढदिवसा निमित्त अशी भव्य धार्मिक स्पर्धा भरवण्यात येत आहे हे आपल्या शहरातील एकमेव व आदर्श घेण्यासारखे उदाहरण आहे.या स्पर्धेत जळगाव शहरातील विविध शाळांमधून १८२५ विद्यार्थ्यांनी या भव्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे बक्षीस वितरण महापौर दीपमाला काळे,माजी महापौर सीमा भोळे,डॉ प्रकाश भंगाळे ,नगरसेवक गणेश सोनवणे,उज्वलाताई बाविस्कर,अनिता भापसे,नगरसेविका नलुबाई सोनवणे,उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण,मातोश्री सौ.सुमनताई भंगाळे,सौ.ज्योती भंगाळे,सौ.सुरेखा भंगाळे,सौ.नीलिमा भंगाळे सौ. ज्योत्स्ना भंगाळे,सौ.पूजा भंगाळे,रत्ना बऱ्हाटे सौ.संगीता भंगाळे,दामिनी पाटील,अर्चना पाटील, मनीषा चौधरी,सविता पाटील,सायली पाटील,दीपाली रडे,सीमा मालू,रुपाली भंगाळे,महेंद्र सोनवणे,महेश पाटील सर यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

सौ.प्रिया व राजेश वारके, जेष्ठ गो सेवक सय्यद इस्माईल  सन्मानित युवा विकास फाउंडेशन व  विष्णूभाऊ भंगाळे मित्र परिवाराचे सक्रिय कार्यकर्ते  राजेश वारके व त्यांच्या पत्नी सौ .प्रिया वारके यांचा श्री हनुमान चालीसा पठण स्पर्धा गेल्या ११ वर्षापासून यशस्वी करण्याकामी सातत्यपूर्ण परिश्रमपूर्वक योगदान दिल्याबद्दल त्यांचा माजी महापौर सीमा भोळे,महापौर दीपमाला काळे यांचे शुभ हस्ते केमिस्ट महिला मंडळच्या वतीने शाल श्रीफळ,भेटवस्तू देवून करण्यात आला.तसेच मागील ३० वर्षापासून सुनील भंगाळे यांच्या निवासस्थानी असलेल्या गो मातांची प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्तव्य दक्ष गोसेवक सय्यद इस्माईल यांचा देखील सत्कार या सोहळ्यात भंगाळे परिवारातर्फे शाल श्रीफळ ,भेटवस्तू देवून डॉ.प्रकाश दादा भंगाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन गणेश लोडते यांनी केले. कार्यक्रमाच्या  यशस्वितेसाठी,खालिद सय्यद,शैलेंद्र खडके,वैभव तायडे,विलास बरडे,समीर गुळवे, ,स्वप्नील रडे,चेतन पाटील,धनंजय कोल्हे ,राजेश वारके,रवी रडे,महेंद्र पाटील,शुभम निकम ,अमोल मोरे,ई.पी.पाचपांडे, बिपीन झोपे,हरिष कोल्हे,विवेक महाजन,प्रविण पाटील,सचिन पाटील,नेमचंद येवले,अजित चौधरी, नरेंद्र बोरसे प्रफुल्ल सरोदे,सचिन महाजन,प्रथमेश पाटील,जीवन बहारे,आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या