Tuesday, October 7, 2025
Homeताज्या बातम्यामहिला सहकारी मंडळाची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

महिला सहकारी मंडळाची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

जळगाव : दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महिला सहकारी मंडळाची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या २७ सप्टेंबर २०२५ रोजी मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.

ही संस्था सहकारी तत्वावर चालविली जाणारी महिलांची एक जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे, जी उद्योजक व कार्यकुशल महिलांना संधी उपलब्ध करून देते. सध्या या संस्थेत सुमारे ३०० सभासद आहेत.सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष मा.अध्यक्ष प्रतिमाताई अत्रे करणार आहेत.सभेत मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा आणि आर्थिक उलाढाल यांचा सविस्तर लेखाजोखा सादर केला जाणार आहे.सभासदांनी या वार्षिक सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती आ.सेक्रेटरी शांता वाणी यांनी केली आहे.सभा दुपारी ४.३० वाजता सुरू होईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या