जळगांव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.राज्याचे प्रभावशाली कर्तुत्ववान राष्ट्रवादी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याने त्यात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईहून अजित पवार हे आज दि.२८ रोजी बारामतीकडे निघाले होते.बारामतीमध्ये विमान उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक होते, अशी माहिती समोर आली आहे.सदर धक्कादायक विमान दुर्घटना बाबत माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की अतिशय परखड स्वभावाचा,निर्मळ मनाचा,वेळेचा भान ठेवणारा नेता,एक जिव्हाळा जपणारा माणूस हरपला आहे.लाडक्या बहिणीच्या योजनेत आर्थिक नियोजन करण्याचे धाडस,कौशल्य दाखवत त्यांनी ही योजना यशस्वी करून दाखवली.शिस्तीचा नेता आम्ही अनभुवला आहे.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.आम्हाला डोंगरा येवढे दुःख आहे.त्यांचे सोबत टीमवर्क अनुभवले आहे.महाराष्ट्रात अशी विमान दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी या घटनेची चौकशी केली जाईल.असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा बारामतीत विमान दुर्घटनेत मृत्यू..
RELATED ARTICLES
