Friday, May 29, 2026
Homeजळगांव शहरभाजपा जिल्हा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती

भाजपा जिल्हा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती

जळगांव – दि.३०(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)भाजपा जिल्हा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर जळगाव अंतर्गत ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे,जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे प्रदेश महामंत्री विजय चौधरी विभागीय संघटन मंत्री रविंद्रजी अनासपुरे खा स्मिताताई वाघ आ सुरेश भोळे (राजूमामा) आ मंगेशदादा चव्हाण आ अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

प्रशांत जाधव ,यांनी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.आगामी काळात ते भाजपा कामगार महानगर जिल्हा अंतर्गत अधिकाधिक समाजकार्य करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान देतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रसंगी प्रशांत यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत सांगितले पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्यासाठी केवळ जबाबदारी नसून एक सन्मानाची शपथ आहे.या विश्वासाचे सोने करण्यासाठी मी प्रामाणिकपणे,निष्ठेने आणि पूर्ण ताकदीने कार्य करीन.समाजसेवा आणि पक्षकार्य यांचा संगम साधत प्रत्येक क्षण कामगार बांधवांन साठी व राष्ट्रहितासाठी अर्पण करण्याचा माझा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी महापौर सौ. दीपमाला काळे,कोषाध्यक्ष विजय वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध क्षेत्रातील व कामगार संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या