जळगांव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिना निमीत्त जळगांव जिल्हाभर २२ जुलैपासून सेवा सप्ताह साजरा करणार आहेत.
यनिमीत्ताने भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ट आघाडी प्रकोष्ट प्रमुख सुनील भंगाळे यांनी शुक्रवार दि. १८/०७/२०२५ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा आयोजीत करण्यात आली होती.
सप्ताहात विविध समाजसेवी उपक्रमाचे आयोजन
त्यात दि. २२/०७/२०२५ शीतशवपेटीचे लोकार्पण केमिस्ट भवन जळगांव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. दि.२३ रोजी रामानंद पोलीस स्टेशन निरीक्षक मा.राजेंद्र गुंजाळ,ए.पी.आय भूषण कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत पो.स्टे.समोरील परिसरात सह जळगांव शहरातील विविध परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.दि.२४ रोजी शालेश विदयार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन सिताबाई ग. भंगाळे शाळा येथे करण्यात आले आहे.दि. २५ रोजी केमिस्ट भवनात फार्मासिस्ट मेळाव्याचे आयोजन , दि.२६ रोजी मेमोग्राफी (महिलांसाठी स्तनरोग तपासणी),तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन त्रिमूर्ती डिस्ट्री.प्रा. लि इच्छादेवी मंदिर जळगांव येथे करण्यात आले आहे, दि.२७ रोजी रूग्णांना फळ वाटप कार्यक्रम सिव्हील हॉस्पीटल जळगांव तसेच दि. २८/०७/२०२५ बाल सुधार गृह इंडिया गॅरेज समोर, जळगांव येथे अन्नदान वाटप कार्यक्रम, वरील सर्व कार्यक्रम हे सर्व ठिकाणी सकाळी ११ वाजता हया वेळेत ठेवण्यात आले आहे.
मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी जन्मदिनानिमीत्त वरीलप्रमाणे सामाजीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ट आघाडी प्रकोष्ट प्रमुख सुनील भंगाळे यांनी पत्रकाद्वारे कळवीले आहे.
