जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील बळीराम पेठेतील परिसरातील श्रद्धास्थान श्री रुद्र लाल मारुती मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने भजन,पूजन,प्रसाद वितरण असे कार्यक्रम संपान होणार आहे.
दि.१५/०२/२०२६.रविवार रोजी सकाळी ७.३० वाजता महाशिवरात्री निमित्त अभिषेक करण्यात येणार असून सकाळी १०.३०.वाजता,दरवर्षा प्रमाणे महा आरती मान्यवर अतीथिंच्या उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर साबुदाणा खिचडी,लाडू प्रसाद(फराळ) स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे.वरील आयोजन् स्थळ-बळीराम पेठ.ब्राम्हण सभा जवळ येथे करण्यात आले आहे तरी सर्व भाविक शिव भक्तांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होवून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बळीराम पेठेतील श्री रुद्र लाल मारुती मंदिरात उद्या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन..
RELATED ARTICLES
