Monday, February 23, 2026
Homeजळगांव शहरपंढरपूरकडे आज मार्गस्थ होणाऱ्या श्री मुक्ताबाई राम पालखी सोबत पायी वारीस जाणाऱ्या...

पंढरपूरकडे आज मार्गस्थ होणाऱ्या श्री मुक्ताबाई राम पालखी सोबत पायी वारीस जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे मोफत औषध सुविधा…

जिल्ह्यातील विविध भागातून निघणाऱ्या पायी वारीला केमिस्ट संघटना सातत्याने मोफत औषध सुविधा देत आहे. व त्याचा कोणताही गवगवा न करता वारी सारख्या निर्मळ,निर्विकार भावना जपणाऱ्या या पवित्र धार्मिक व सामाजिक एकोपा जपणाऱ्या परंपरेचे संवर्धन व्हावे त्यात संघटनेचा हातभार लागावा या भावनेने संघटना मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम मनापासून राबवत आहे.आज दि.१० रोजी सकाळी ८ वाजता जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनिलभाऊ भंगाळे,सचिव अनिल झवर,खजिनदार शामकांत वाणी,व इतर तालुका पदाधिकारी,केमिस्ट बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सद्गुरूआप्पा महाराज समाधी मंदिरात वारीच्या निरोप सोहळयात सर्व प्रकारची औषध सामुग्री मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प श्री.मंगेश महाराज जोशी यांचेकडे सुपुर्द केली जाणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या