Monday, February 23, 2026
Homeजळगांव शहरझवर परिवारातर्फे नवी पेठेत महेश नवमी निमित्त शोभा यात्रेत सहभागी समाज बांधवांना...

झवर परिवारातर्फे नवी पेठेत महेश नवमी निमित्त शोभा यात्रेत सहभागी समाज बांधवांना सुगंधी शितल दुधाचे वितरण सेवा..

जळगांव – दि.४ ( धर्म साथी मीडिया नेटवर्क)
शहरातील महेश नवमीच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.यात सांस्कृतिक सामाजिक,अश्या विविध कार्यक्रमांचा सहभाग आहे.आस्व.श्यामसुंदर आणि स्व.सौ.पुष्पा झवर यांच्या स्मृती निमित्त झवर परिवाराच्या वतीने माहेश्वरी समाजाच्या सायंकाळी काढण्यात येणाऱ्या महेश नवमीच्या भव्य शोभा यात्रेत दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील सुप्रसिद्ध भारत दुग्धालय निर्मित सुगंधी शीतल दूध वितरण सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शोभा यात्रेत सहभागी समाज बांधवांना दि.४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ चौक येथे सुगंधी शीतल दूध वितरण सेवा झवर परिवारातर्फे दिली जाणार आहे.तरी सर्व समाज बांधवांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन झवर परिवारातर्फे मनीष झवर,गिरीश झवर,मधुर झवर,झवर परिवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या