Tuesday, October 7, 2025
Homeनशिराबाद परिसर..जिल्हा प्रशासनातर्फे नशिराबाद येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिरात...

जिल्हा प्रशासनातर्फे नशिराबाद येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिरात विविध लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

नशिराबाद – दि.१२.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिराचे आयोजन दि.१२.जुन गुरुवार रोजी नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल येथे अधिकारी वर्ग,विभाग प्रमुख,मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलेले होते.समाधान शिबिरा अंतर्गत विविध शासकीय विभाग यांच्या सर्व लाभार्थ्यांना लाभार लाभाचे वितरण यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व २७ विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.शिबिरामध्ये कृषी नगरपरिषद तहसील कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय तलाठी कार्यालय आरोग्य विभाग अग्निशमन दल महिला बचत गट जिल्हा परिषद शिक्षण विभाग जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग मोफत रक्त तपासणी विविध प्रकारचे दाखले सेतू आधार नोंदणी केंद्र तसेच इतर २७ प्रकारचे विविध स्टॉल लावण्यात आलेले होते यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करण्यात आले अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना दप्तर शालो शालेय उपयोगी वस्तू याचे वाटप करण्यात आले तसेच रेशन कार्ड विविध प्रकारचे दाखले नगरपरिषदे अंतर्गत विविध प्रकारच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अनुदान वितरित करण्यात आले.यावेळी नशिराबाद व आसपासच्या परिसरातील नागरिक लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील प्रांत अधिकारी विनय गोसावी तहसीलदार शितल राजपूत नगरपरिषद मुख्याधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन योगेश पाटील विकास धनगर विकास पाटील कीर्तिकांत चौबे पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील व मोनाली लंगरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी नशिराबाद मिलिंद देवरे व ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या