Monday, February 23, 2026
Homeकेमिस्ट विश्व..जळगांव तालुका केमिस्ट संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न...एफ.डी.ए असिस्टंट कमिशनर प्रशांत अस्वार...

जळगांव तालुका केमिस्ट संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न…एफ.डी.ए असिस्टंट कमिशनर प्रशांत अस्वार यांनी केले मार्गदर्शन..

जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)केमिस्ट भवन येथे दि. १३  रोजी रात्री ८ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.त्या सभेला केमिस्ट बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.सभेत जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झंवर यांचे मौलिक मार्गदर्शनाचा लाभ केमिस्ट बांधवांना झाला. त्यात येणाऱ्या काळात वाढत असलेल्या समस्या कमी करण्यासाठी काय केले पाहिजे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.तसेच एफ.डी.ए असिस्टंट कमिशनर प्रशांत अस्वार यांनी केमिस्ट बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले,ह्या बैठकीत केमिस्ट संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्याच्या वतीने उपस्थित सगळ्या केमिस्ट बांधवांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच व्यासपिठावर उपस्थित पदाधिकारी जिल्हा कोषाध्यक्ष शामकांत वाणी,ब्रजेश जैन,दिनेश मालू ,संजय तिवारी,पंकज पाटील,खालील सय्यद व तालुका पदाधिकारी व झोन प्रमुख यांचे सुद्धा तालुका संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या