जळगांव – दि.२१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात संघटनात्मक व सामाजिक कार्य करणारे जळगांव जिल्हा केमिस्ट संघटना अध्यक्ष केमिस्ट भूषण सुनिल भंगाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि.२१ रोजी लेवा भवनात भव्य स्वरुपात शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री हनुमान चालीसा पठण स्पर्धा युवा विकास फाँडेशन व विष्णू भाऊ भंगाळे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जळगाव शहरातील विविध शाळांमधून १८२५ विद्यार्थ्यांनी या भव्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे.सकाळी ८ वाजता मान्यवर अतिथी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा प्रारंभ होणार असून दुपारी १२.१५ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
श्री हनुमान चालीसा पठण स्पर्धा आयोजनाचे हे ११ वे वर्ष आहे.शालेय विद्यार्थ्याना संस्कार व आपल्या संस्कृतीचा पाया असणारे धार्मिक स्तोत्र पठणातून पाठांतराची गोडी लागावी या हेतूने तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बल,विद्या,बुद्धीचे दैवत असलेल्या श्री मारुती रायाचे हनुमान चालीसा विद्यार्थ्यांनी दररोज वाचणे,म्हणणे,गरजेचे आहे,यामुळे बुद्धी आणि कार्यक्षमता वाढत असल्याने ही स्पर्धा दरवर्षी विशेष महत्व देवून केमिस्टभूषण सुनिल भंगाळे यांच्या वाढ दिवसा निमित्त भरवण्यात येते.व शालेय विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी होतात.
युवा विकास फोंडेशन व माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे यांचा मित्र परिवार वर्षभर विद्यार्थी व युवा वर्गासाठी सातत्याने क्रीडा स्पर्धा,स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन वर्ग,श्री हनुमान चालीसा पठण स्पर्धा अश्या विविधांगी स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहे.त्या मुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासा साठी ह्या संस्था मोलाचे योगदान देत आहे.
तरी विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी लेवा भवन येथे येवून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी व स्पर्धकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन युवा विकास फाउंडेशन व विष्णूभाऊ भंगाळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
