जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य करीत धडाडीच्या सामाजिक सेवेतून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजाची अहोरात्र सेवा करणारे डायनॅमिक जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या वाढ दिवसानिमित्त केमिस्टभूषण चषक क्रिकेट स्पर्धा २०२६ भव्य स्वरूपात दि.१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.सकाळी ७ वाजता मान्यवर अतिथिंच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.ही स्पर्धा केमिस्ट बांधवांसाठी एक पर्वणीच मानली जाते.
यात दि.१५फेब्रुवारी(रविवार)२०२६.एम.के.स्पोर्ट्स मैदान क्रमांक-२,सावखेडा शिवार,जळगाव येथे सकाळी ७ वाजे पासून या भव्य क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.यात ६-६ ओव्हरचे सामने खेळले जाणार आहे.जिल्हाभरातील केमिस्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेत जिल्हा कमिटी विरुद्ध पिंप्राळा टायगर्स सेलिब्रिटी (७ वाजता ),भंगाळे इलेव्हन विरुद्ध त्रिमूर्ती ब्लास्टर्स सकाळी(८ वाजता),न्यू.बी.जे.सुप्रभा विरुद्ध गुडविल डिस्ट्रीब्युटर्स (सकाळी ९ वाजता), एरंडोल विरुद्ध अमळनेर (सकाळी १० वाजता) भडगाव विरुद्ध यावल टायगर्स (सकाळी ११ वाजता) चाळीसगाव विरुद्ध जामनेर (दुपारी १२ वाजता)असे सामने खेळवले जाणार आहे.
सदर स्पर्धा,नियोजित वेळेत पूर्ण करायची असल्याने प्रथम फेरी नंतर सर्व विजयी संघांचे प्रथम चार संघ, नेट रनरेट नुसार,सेमी फायनल साठी पात्र ठरतील,हा नियम स्पर्धे पूर्वीच घोषित केला जात आहे. ६-६ ओव्हरचे सामने (वेळे अभावी,किंवा परिस्थिती नुसार केव्हाही यात बदल होऊ शकेल)
सर्व संघांनी आपल्या खेळाडूंचे नाव क्रिक हिरोज वर ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करणे,तसेच सर्व कागदपत्र आयोजन समिति कडे जमा करणे (स्पर्धेच्या पूर्व संधेपर्यत)बंधनकारक आहे.त्यासाठी केमिस्ट ग्रुप वर लिंक देण्यात आली आहे.आयोजना संदर्भात आयोजकांचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. पंचांचा निर्णय अंतिम आणि सर्वमान्य असेल.
या केमिस्ट भूषण चषक स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती,जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी तसेच समस्त केमिस्ट बंधू भगिनी,जळगाव जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशन, जळगाव हे परिश्रम घेत आहेत.
केमिस्ट भूषण सुनिल भंगाळेंच्या वाढदिवसा निमित्त भव्य केमिस्ट भूषण चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..
RELATED ARTICLES
