जळगांव-दि.२१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) केमिस्ट भवन येथे २०.०९.२५ रोजी जी.एस.टी.संदर्भात महत्त्वाची अशी केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन देणारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यात १३० केमिस्ट बांधवांनी सहभाग नोंदवला.तसेच सीए सौरभजी लोढा,सी.ए.नचिकेत जाखेटे,सीए आकाश कंकरिया यांचे अमूल्य असे मार्गदर्शन केमिस्ट बांधवांना लाभले.तसेच GST मध्ये बांधवांना येणाऱ्या* अडीअडचणींवर त्यांनी योग्य असे दिषादायक मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले.
तालुक्याच्या वतीने अध्यक्ष समीर गुळवे यांनी संघटनेचे कुशल नेतृत्व,प्रेरणास्थान जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचे आभार मानले. त्यांनी आपला केमिस्ट बांधव हा येणाऱ्या काळामध्ये अपडेट होणे गरजेचे आहे यासाठी त्यांनी CA असोसिएशनला विनंती करून केमिस्ट बांधवांना GST संदर्भात आपण मार्गदर्शन करावे असे सांगितले,त्याचा नक्कीच उपयोग केमिस्ट बांधव मिटींगला जे उपस्थित होते त्यांना झाला आहे.केमिस्ट बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
तसेच या विशेष मार्गदर्शन बैठकीला जिल्हा पदाधिकारी जिल्हा सचिव अनिल झंवर,कोषाध्यक्ष शामवाणी,ब्रजेश जैन,खालीद सय्यद,तालुकाध्यक्ष समीर गुळवे तालुका सचिव विलास बर्डे तसेच सर्व तालुका पदाधिकारी व झोन प्रमुख यांनी उपस्थिती दिली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केमिस्ट पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
केमिस्ट बांधवांना विशेष बैठकीत देण्यात आले जी.एस. टी. संदर्भात मार्गदर्शन..तालुका संघटनेचे आयोजन..
RELATED ARTICLES