जळगांव – दि.१९ ( धर्म साथी मीडिया नेटवर्क) COPD(Chronic obstructive Pulmonary Disease)२०२५ मध्ये जगभरातील COPD चा प्रसार वाढण्याची शक्यता आहे, कारण जागतिक स्तरावर वृद्ध लोकसंख्या वाढत आहे आणि COPD IPD सारख्या आजारांना कारणीभूत घटक. (जसे की प्रदूषण आणि तंबाखूचे सेवन) अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत. जागतिक COPD दिन (Wond COPD Day) हा दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. आणि २०२५ मध्ये त्याची थिम ”
शॉर्ट ऑफ ब्रेथ, थिंक सीओपीडी” (short of Breath, Think (COPD) आहे.
जागतिक स्तरावर COPD ची सद्यस्थिती आणि २०२५ मधील वाढण्याची स्थिती विचारात घेता काय उपाय व प्रभावी उपाय योजना यातून सुरक्षित राहण्यासाठी राबवण्यात येवू शकतात त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्र परिषदेचे आयोजन दि.१८ रोजी करण्यात आले होते.
यात copd आजरा बाबत तपासणी शिबिराचे आयोजन दि.२० गुरूवार रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत शाहू नगरात आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.स्वप्नील चौधरी ( चेस्ट क्लिनिक ) सहयोग क्रिटिकल शेजारी यांनी दिली या संदर्भात नाव नोंदणी साठी तुषार पाटील मो.९९७५८७७२१२ ,जावेद शेख मो.९७६३८३०८५२ यांचे कडे नावे नोंदवावी असे आवाहन त्यांनी या वेळी माहिती देताना केले आहे.
COPD आजरा संदर्भात शहरात तपासणी शिबिराचे आयोजन.. पत्र परिषदेत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी दिली माहिती..
RELATED ARTICLES
