जळगांव – दि.१८(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)दि.११ते १४ मे २०२५ दरम्यान (आय.आय.एम्) गया,बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया २०२५ योगासन विभागात जळगांवची रुद्राक्षी भावे हिने महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करून दोन सुवर्ण पदक एक ब्रांझ पदक पटकावले आणि सहभागी मुलींच्या विभागात उत्कृष्ठ कामगिरी बजावून गर्ल चॅम्पियन हा किताब मिळवून आपले स्थान निश्चित केले.रुद्राक्षी ही मूळची जळगांवची रहिवासी असून सध्या योगासन अभ्यासा सोबत आपले नियमित शिक्षण अहमदनगर जिल्ह्यामधील ध्रुव ग्लोबल स्कूल,मालपाणी ग्रुप येथे स्कॉलरशिप वर पूर्ण करत आहे.सलग तिसऱ्या वर्षी तिने खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तिने गोल्ड मेडल पटकावले.
याआधी देखील तिने अनेक वेळा राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल जिंकून स्वतः ला सिद्ध केले आहे. ती प्रज्ञा नाईक यांची सूकन्या आहे.तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.