Wednesday, April 1, 2026
Homeजळगांव शहरजळगावच्या सुविधापूर्ण हॉटेल विश्वाच्या वैभवात भर घालणाऱ्या मास्टिफ सिल्व्हर इन हॉटेलचा आज...

जळगावच्या सुविधापूर्ण हॉटेल विश्वाच्या वैभवात भर घालणाऱ्या मास्टिफ सिल्व्हर इन हॉटेलचा आज शुभारंभ सोहळा..

जळगांव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगांव शहरातील स्टेशन रोडवरील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहकांना दर्जेदार व उच्च गुणवत्तापूर्ण सुविधा सेवा देण्यासाठी आदरतिथ्याच्या राजेशाही थाटाची अनुभूती देणाऱ्या मास्टीफ सिल्व्हर इन् हॉटेल या भंगाळे परिवाराच्या नवीन हॉटेलचा भव्य शुभारंभ सोहळा मान्यवर अतिथींच्या विशेष उपस्थितीत आज दि.२९ रोजी सायंकाळी ५ वाजता थाटामाटात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.
या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,समारंभाचे अध्यक्ष पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,सन्माननीय अतिथी वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे, केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे तसेच प्रमुख अतिथी म्हणून खा.ॲड.उज्वल निकम, खा.स्मिता ताई वाघ,आमदार एकनाथराव खडसे,आ.राजू मामा भोळे,आ.मंगेश चव्हाण,आ.चंद्रकांत सोनवणे,आ.किशोरआप्पा पाटील, आ.अनिल पाटील,आ.चंद्रकांत पाटील,आ.अमोल जावळे ,आ.अमोल पाटील,डॉ.उल्हास पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, महापौर जळगाव शहर सौ दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.मास्टीफ सिल्वर इन हॉटेल या नवीन सेवा दालनात ४६ वातानुकूलित सुविधापूर्ण रूम्स,२ लक्झरी सुट्स, फॅमिली रेस्टॉरंट,बँक्वेट हॉल,सेमिनार हॉल,साऊंड प्रूफ विंडो,अश्या उत्तम सुविधा एकाच छताखाली रेल्वे स्टेशन परिसरातील मानसिंग मार्केट समोर या मध्यवर्ती जागेत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती संचालक केमिस्टभूषण सुनिल भंगाळे यांनी माहिती देताना सांगितले.तरी शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भंगाळे परिवारातर्फे मास्टिफ सिल्वर इन हॉटेलच्या व्यवस्थापन प्रमुख सिद्धी भंगाळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या