Friday, May 29, 2026
Homeजळगांव शहरभाजप विकासाचा विचार ,जनहिताच्या शासकीय योजना गरजू पर्यंत पोहोचव ण्याचे कार्य बुद्धिजीवी...

भाजप विकासाचा विचार ,जनहिताच्या शासकीय योजना गरजू पर्यंत पोहोचव ण्याचे कार्य बुद्धिजीवी आघाडीने करावे-आ.राजू मामा भोळे.. भाजपा बुद्धिजीवी आघाडी मार्गदर्शन बैठक उत्साहात संपन्न..

जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) भाजपा बुद्धिजीवी आघाडीच्या मार्गदर्शन बैठकीचे आयोजन दि.८ रोजी सायंकाळी कमल पॅराडाइज मागील परिसरात भाजपा बुद्धिजीवी आघाडी उपाध्यक्ष स्वप्नील रडे यांच्या निवास स्थानी  करण्यात आले होते.त्याबैठकीला सदस्य पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रसंगी आ.राजू मामा भोळे यांचा सत्कार आघाडी तर्फे करण्यात आला. बुध्दीजीवी आघाडीचे श्रीकांत वाणी यांनी प्रास्तविक करताना बुद्धिजीवी आघाडीने पुढील वाटचालीत करावयाच्या कार्याची माहिती दिली.अध्यक्ष संजय नारखेडे यांनी आपल्या मनोगतात बुद्धिजीवी आघाडी माध्यमातून मोठे व्यासपीठ भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपलब्ध झाल्याने आपण सर्वांनी ज्यांना राष्ट्र सेवेची आवड आहे त्यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग घेवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी साधावी .सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन या प्रसंगी केले.या मार्गदर्शन बैठकीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आ.राजूमामा भोळे यांनी उपस्थित बुद्धिजीवी आघाडी सदस्य पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय जनता पक्षाचे वैचारिक व विकास कार्य,शासन राबवत असलेल्या जनहिताच्या योजना समाजात तळागाळा पर्यंत पोहचवण्याचे कार्य बुद्धिजीवी माध्यमातून आत्मीयतेने व्हावे जेणेकरून खऱ्या राष्ट्रसेवेला हातभार लागेल.सामाजिक सेवा घडवणारे अनेक छोटे-मोठे उपक्रम राबवून समाजाची सेवा करावी.गरजू उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्यासाठी आवश्यक ते सहकार्य दिले जाणार आहे.वैचारिक विकास साधून कृतिशीलतेची कास धरावी असेही त्यांनी सांगितले.या प्रसंगी भाजपा बुध्दीजीवी आघाडी तर्फे अध्यक्ष संजय नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष स्वप्नील रडे,श्रीकांत वाणी ,संजय तिवारी,कनकमल राका,दिलीप वाणी,विजय जैन,गिरीश जोशी,नितीन नेवे,ॲड.नितीन रेंभोटकर,दीपक चौधरी,अनिल साठे,गोपाळ पवार,राजेंद्र क्षीरसागर,यांचेसह इतर पदाधिकारी सदस्यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या