Monday, March 2, 2026
Homeजळगांव शहरफुकटच्या सवयींमुळे समाजाची पंगू अवस्था- पद्मश्री पोपटराव पवार..कोल्हापूरच्या अनुराधा भोसले, मोहाडीच्या सह्याद्री...

फुकटच्या सवयींमुळे समाजाची पंगू अवस्था- पद्मश्री पोपटराव पवार..कोल्हापूरच्या अनुराधा भोसले, मोहाडीच्या सह्याद्री फार्मसला डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कार प्रदान..

डॉ आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार स्वीकारतांना संस्थास्तरीय गटातून सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि.व व्यक्तीगत गटातून अवनि फाऊंडेशनच्या मा अनुराधाताई भोसले.

जळगाव-दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
सरकार आता सगळंच फुकट देतंय.धान्य फुकट,वीज फुकट त्यामुळे इच्छाशक्ती कमजोर झाली आहे.आम्ही आमच्या गावात फुकट काहीही देत नाही.आता फक्त बजेटमधून पत्त्याचा कॅट आणि मद्य द्याचेच बाकी असल्याची खंत व्यक्त करीत या फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू झाल्याचे प्रतिपादन आदर्श हिवरेबाजार गावाचे उपसरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी आज येथे केले. दरम्यान केशवस्मृती प्रतिष्ठान ही संस्था डॉ. अविनाश आचार्य यांच्या संस्कारातून उभी राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

समाजाच्या तळागाळात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा गौरव करण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सह.बँक लि.यांच्यावतीने शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे आयोजित “डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार”सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पुरस्कारार्थी अवनी फाउंडेशनच्या अनुराधा भोसले, सह्याद्री फार्मर्स कंपनीचे विलास शिंदे,केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भरत दादा अमळकर, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, सीईओ संजय नागमोती, केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप चोपड़ा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर सुयोग गुरव यांनी गीत सादर केले.यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांचे स्वागत डॉ. भरतदादा अमळकर यांनी केले. अनुराधा भोसले यांचे स्वागत दिलीप चोपडा तर विलास शिंदे यांचे स्वागत सतीश मदाने यांनी केले.

तापमान बदलाचे मोठे जागतिक संकट

पद्मश्री पोपटराव पवार यांनी पुढे बोलतांना सांगितले की, क्रीकेटची आवड असतांना अपघाताने मी गावाकडे आलो. गावातील घराघरात पाण्या ऐवजी दारू होती. त्यामुळे हे आव्हान पेलत त्यावर काम करण्याची तयारी केली. टीमवर्क आणि समर्पणाची भावना असल्याशिवाय काम तडीस जात नाही.कार्याचा विस्तार करण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असते.एखादी जरी चूक झाली तरी आताच्या काळात लगेच ब्रेकींग न्यूज होते असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपला देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतोय. 75 वर्षापूर्वी जे निसर्गाकडून घेतले आहे ते शंभरीत परत नाही दिले तर मोठे संकट समाजासमोर उभे राहणार आहे. जगावर तापमान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. पाण्याचे प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येत्या 25 वर्षात शेती समोरची आव्हाने कशी असतील यावर काम करावे लागणार आहे. जगातील सध्याची परीस्थिती पाहिली तर तापमान बदलाचे मोठे जागतिक संकट उभे राहिले आहे. माती, पाणी दूषित झाल्याने आरोग्य दुषित होऊ लागले आहे. संकटे आली की संधी निर्माण होते. त्यासाठी आधार वाटावा अशी माणसे उभी राहिली पाहिजे. सध्याच्या काळात ताणतणावमुळे मुलं व्यसनाधिन होत आहे. येत्या 10 वर्षात ही तरुणाई काय करेल याचा विचार करावा लागणार आहे. आम्ही आमच्या गावात एकही पानटपरी, एकही पुतळा उभा राहू दिला नाही. लोकसहभागातून गावाचे सर्व निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या तेव्हा जाणीव झाली की संस्था ह्या संस्कारातून उभ्या राहतात. डॉ. अविनाश आचार्य यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींच्या समुहाने चांगल्या समाजनिर्मीतीचे कार्य हाती घेतले असल्याचेही त्यांनी कौतुक केले.

शहर स्वच्छतेचा विडा केशवस्मृतीने उचलावा
                                       – अनुराधा भोसले

पुरस्कार प्रदान झाल्यानंतर सत्कारा उत्तर देतांना अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी सांगितले की, सकाळपासून केशवसमृती प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. प्रत्येक कार्यकर्त्यात  आत्मविश्वास आणि सेवाकार्य दिसून आले. समाजाविषयीचे प्रेम व आत्मीयता असलेले असे कार्यकर्ते बघितले नाही. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पातून मलाही खूप काही शिकायला मिळाले. केशवस्मृती प्रतिष्ठानने आता शहर स्वच्छतेचा विडा उचलावा अशी विनंती त्यांनी केली. समाजासाठी आपण जेव्हा काही करतो तेव्हा जे आत्मिक समाधान मिळते ते मोजता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अवनि अंतर्गत 2002 ला पहिली शाळा सुरु केली. 2005 च्या पूरात सगळं वाहून गेले. समाजाने मात्र प्रामाणिक इच्छाशक्ती ओळखल्याने आज एक एकरात अवनिचे काम सुरू आहे. मी अत्यंत गरीबी पाहिली आहे. विधात्याने गरीबी कुणालाही देऊ नये. विटभट्टी काम किंवा बालमजूरी करणाऱ्या या मुलांमध्ये मी माझे बालपण पाहते. त्यामुळे ही मुले शिकली पाहिजे हा विचार प्राधान्याने येतो. शिक्षणच आपल्याला चांगले घडवू शकते असे मत अनुराधा भोसले यांनी व्यक्त केले.

शेतीतील गुंता सोडविण्याला प्राधान्य द्या विलास शिंदे

सोहळ्यातील संस्थास्तरीय पुरस्कार स्विकारणारे सह्याद्री फार्मर्सचे विलास शिंदे यांनी सांगितले की, शेतीत प्रचंड गुंता निर्माण झाला आहे. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही, समुहाची ताकद असेल तर चित्र बदलू शकते. केशवस्मृती प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. समुदायाने उभे राहिल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटत नाही. शेतीमध्ये प्रश्नांची मालिका आहे. एक गुंता सोडवायला गेले की दुसरा होतो. त्यामुळे शेती ही सेवा न मानता आहे हे मानून काम करण्याची गरज असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त वे यशस्वी व्हायचे असेल तर चांगले पिकवता आले पाहिजे, चांगले विकता आले पा चांगले हाताळता आले पाहिजे. नाशिक जिल्ह्यात आजही कां‌द्यासाठी आंदोलने होतात. पण प्रश्न काही सुटत नाही. शेतीच्या प्रगतीसाठी व्यवस्था उभी करावी लागणार असल्याचेही विलास शिंदे यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सोहळ्यात कोल्हापूर येथील अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांना वैयक्तीक तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स कंपनीला संस्थास्तरी पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भरतदादा अमळकर, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.वैयक्तीक पुरस्काराचे स्वरूप शाल,मानपत्र,एक लाखांचा धनादेश तर संस्थास्तरीय पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र, दीड लाखांचा धनादेश असे होते.संचालिका वैजयंती पाध्ये व कौशल्य विकासच्या संचालिका दीप्ती बारी यांनी मानपत्राचे वाचन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या