Monday, February 23, 2026
Homeजळगांव शहरआज दि.१५ रोजी जळगाव जनता बँक संचालित बचत गट उत्पादित वस्तूंची महाशिवरात्र...

आज दि.१५ रोजी जळगाव जनता बँक संचालित बचत गट उत्पादित वस्तूंची महाशिवरात्र बाजार पेठ…

जळगांव-दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)बचत गटांचे माध्यामातून “महिला स्वावलंबन’ संकल्पना साकार होण्या दृष्टीने विकासात्मक धोरण अवलंबत बँकेतर्फे जळगाव जनता बँक संचालित बचत गट उत्पादित वस्तूंची महाशिवरात्र बाजार पेठ आज दि.१५ रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर परिसरात आयोजित केलेली आहे.दरवर्षी महाशिवरात्री निमित्त हा उपक्रम राबवला जात आहे.यशस्वी होत आहे.अनेक होतकरू महिलांना बाजारपेठ संकल्पनेतून व्यवसाय वृध्दी होवून चालना मिळत आहे.त्यांच्या आत्मविश्वासात भर पडत आहे.जळगांव जनाता बँक महिला बचत गट विभाग त्यांना अश्या अनेक लहान मोठ्या उपक्रमातून प्रोत्साहित करत आहे.स्वावलंबी होण्यासाठी मदत करत आहे.सर्वांनी दिनांक १५/०२/२०२६ रोजी ओंकारेश्वर मंदिराजवळ,वेळ सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वा.पर्यन्त बाजारपेठ प्रदर्शनीला भेट देऊन महिलांचा उत्साह वाढवावा आवश्य भेट द्यावी असे आवाहन.बँकेच्या बचत गट विभागातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या