Monday, February 23, 2026
Homeजळगांव शहरसुरभीचे संक्रांती हळदीकुंकू निमित्त विविध कार्यक्रम..सत्कार ,बक्षीस वितरण..

सुरभीचे संक्रांती हळदीकुंकू निमित्त विविध कार्यक्रम..सत्कार ,बक्षीस वितरण..

जळगांव – दि.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळातर्फे दि.२४ शनी रोजी ज्येष्ठ नागरिक संघ हॉल मध्ये संक्रांती हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला प्रमुख वक्त्या सौ अपर्णा कुळकर्णी, अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी सचिव मानसी जोशी ह्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. नंतर १५० व्या वंदेमातरम शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त सामूहिक वंदेमातरम म्हणण्यात आले. प्रस्ताविक सचिव मानसी जोशी ह्यांनी केले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिन विरोध निवडून आलेल्या वार्ड क्र ७ च्या नगरसेविका सौ दीपमाला ताई काळे ह्यांचा सत्कार अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते करण्यात आला.वास्तु विशारद सौ अपर्णा कुळकर्णी ह्यांनी वास्तु बद्दल मार्गदर्शन व उपस्तित महिलांच्या प्रश्नांचे शंका निरासन केले. तसेच ह्यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत तिळ/मटार/गाजर ह्या पासून गोड /तिखट पदार्थ घरून करून आणायचा होते स्पर्धेत गोड पदार्थ मध्ये प्रथम – सौ उषा पाठक (मटार वडी)द्वितीय – सौ ललिता टिपरे ( तिळगुळ पोळी ) तिखट प्रथम – सौ मालती चौक ( मटारची मोकळी डाळ)द्वितीय – सौ प्रतीक्षा मोहरीर ( मटार कचोरी ) स्पर्धकांनी पराठे,पंचामृत,अप्पे,वड्या, विविध प्रकार केले होते.
.स्पर्धे नंतर सुरभी च्या सभासद सौ सिंधुमती वरणगावकर ह्यांना सुरभी उत्कृष्ट सभासद पुरस्कार देण्यात आला. नंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.सौ अविता जोशी ह्यांनी शंखनाद केला.सूत्रसंचालन व आभार सौ आशा जोशी ह्यांनी मानले.पाककला स्पर्धेचे परीक्षण सौ स्वप्नगंधा जोशी ह्यांनी केले.सौ अश्विनी जोशी, सौ सविता नाईक, मानसी जोशी, ज्योती भोकरडोळे, पूनम जोशी, सुनीता सातपुते,अविता जोशी, सौ स्मिता शुक्ल, सौ रेवती शेंदुर्णीकर,सौ प्रतीक्षा शुक्ल ,व ज्येष्ठ नागरिक संघ ह्यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या