जळगांव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)मी भारतीय जनता पक्षाच्या स्थापने पासून आणि त्या आधीही भारतीय जनसंघाच्या काळापासून पार्टी चा एकनिष्ठ व समर्पित कार्यकर्ता असून जळगाव शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहे.म्हणूनच पक्षाने आदेश दिला तर कोणत्याही प्रभागातील खूल्या प्रवर्गातून निवडणूक लढण्यास तयार असल्याची भूमिका धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी संवाद साधताना उदय भालेराव यांनी स्पष्ट केली.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेत नगरसेवक म्हणून तसेच भाजपा चा गटनेता म्हणून काम केलेले असल्याने शहरातील नागरी समस्यांची जाणीव आहे. त्याचबरोबर माजी खासदार स्व.डॉ गूणवंतराव सरोदे, स्व.वाय.जी.महाजन सर,स्व.हरीभाऊ महाजन यांच्या समवेत काम केलेले असल्याने,शासन दरबारी जनतेच्या समस्या मांडण्याची व त्या सोडवण्याची हातोटी असल्याने जळगाव शहरातील नागरी समस्यांचे निराकरण मी पार्टी च्या शिर्षनेतृत्वाच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे करू शकतो.असेही त्यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर शहरातील कोणत्याही प्रभागातील खूल्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी असल्याचे प्रतिपादन शहरातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा महानगर जिल्हा उपाध्यक्ष,माजी नगरसेवक कृष्णेंद्र उपाख्य उदय नारायण भालेराव यांनी धर्मसाथीशी बोलताना केले आहे.
या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना भालेराव यांनी सांगितले की, केंद्रातील मोदीजींच्या तसेच राज्यातील देवेंद्रजींच्या सरकारच्या कामगिरीवर जनता संतूष्ट आहे.
विकासाची दृष्टी असलेले व राज्यात संकटमोचक म्हणून ख्याती असलेले नेते ,जलसंपदा मंत्री गिरीशभाउ महाजन,गेले तीन टर्म आमदार म्हणून जळगाव च्या विकासासाठी झटणारे, सर्व सामान्य जनतेच्या सूख-दू:खात सदैव सहभागी असणारे आमदार राजू मामा भोळे,लोकसभेत समर्थपणे जळगावचे प्रश्न मांडणा-या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या कर्तृत्वावर व नेतृत्वावर जळगावकरांचा अलोट विश्वास आहे. केंद्रातील भाजपा सरकार, राज्यातील भाजपा व महायूतीचे सरकार व महापालिकेतील भाजपा ची सत्ता या ट्रीपल इंजिन च्या जोरावर जळगाव चा विकास नक्की होणार हे जळगावातील नागरिक ओळखून आहेत.
जळगावकर मतदार शहरात जात-पात व पैसा याचा विचार न करता पूर्वीपेक्षा अधिक संख्येने भारतीय जनता पार्टी चे उमेदवार निवडून आणणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.
जळगाव शहरातील कोणत्याही प्रभागातील मतदार, उमेदवाराची जात पाहून नव्हे तर पक्ष आणि कमळाचे फूल हे निवडणूक चिन्ह पाहून मतदान करतात. त्यामुळेच कोणत्याही एका विशिष्ट प्रभागात नव्हे तर पक्षाच्या आदेशानुसार कूठल्याहि प्रभागाच्या खूल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी होण्याची मला खात्री आहे असा विश्वास माजी नगरसेवक उदय भालेराव यांनी या प्रसंगी व्यक्त केला आहे.
