Tuesday, April 14, 2026
Homeजळगांव शहरलांडोरखोरे उद्यानात रंगली.. नवी पेठ महिला मंडळाची भरीत पार्टी..

लांडोरखोरे उद्यानात रंगली.. नवी पेठ महिला मंडळाची भरीत पार्टी..

जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शहरातील सामाजिक व सांस्कृतिक सेवा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त नवी पेठ महिला मंडळाच्या वतीने लांडोरखोरे उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात भरीत पार्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मंडळाच्या सक्रिय सभासदांची मोठी उपस्थिती या उपक्रमाला लाभली.या प्रसंगी मंडळाने विविध खेळांच्या स्पर्धा मध्ये सहभाग घेतला व त्यात प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक विजेत्या महिला स्पर्धकांना दिली.तसेच उद्यानाची भ्रमंती करण्यातआली.यात विविध प्रकारच्या वृक्षांची माहिती महिला सदस्यांना  करून देण्यात आली.या भरीत पार्टी उपक्रमात महिलांनी लज्जतदार वांगे भरीताचा आस्वाद घेतला. भरीत पार्टी आयोजन यशस्वी करण्यासाठी नवी पेठ महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती उर्मिला झंवर यांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थापन प्रमुख वैशाली जोशी,नीलकमल टाक,संध्या जहांगीर व इतर कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या