जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव महानगर पालिका निवडणूक लवकरच जाहीर होत आहे त्यानुसार ब्राह्मण समाजाने या निवडणुकीत समाजासाठी नेतृत्व करणे ही काळाची गरज असून. त्या अनुषंगाने ब्राह्मण समाजाने समाजाच्या उत्कर्षासाठी, यशस्वी वाटचालीसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणे आवश्यक आहे असे सामजिक आवाहन ब्राह्मण सभा जळगावचे अध्यक्ष श्री नितीन कुळकर्णी यांनी केले आहे.
या विषयी धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले की जळगाव शहरातून कमीत कमी ५ नगरसेवक आपण निवडून आणू शकतो. त्यानी स्वतः पुढाकार घेऊन पहिली उमेदवार त्यानी त्याची पत्नी सौं नम्रता नितीन कुळकर्णी ह्या वार्ड क्रमांक १३ मधून बीजेपी कडून निवडणूक लढवण्यास इश्चुक असल्याचे त्यांनी सांगितले. व त्यानी आव्हान केल आहे की. समाजाने आता मागे राहू नये ,समाजातील युवा,युवती वर्गासह महिलांनी पुढाकार घेवून राजकरणात सहभागी व्हावे. अजूनही ब्राह्मण समाजातील कोणी इच्छुक निवडणूक लढवण्यास असतील त्यानी त्याचं नाव दयावे आणी वार्ड क्रमांक दयावे त्यानी कुठल्याही पक्षा कडून निवडणूक लढवावी. हें सागत असताना त्यानी सर्व ब्राह्मण समाजाला सुद्धा आवाहन केल आहे की ब्राह्मण समाजाचा उमेदवार ला पूर्ण सहकार्य करावं पूर्ण शक्तिनिशी त्याच्या पाठीशी उभे राहावे. तो कोणत्या पक्षा कडून निवडून लढतो आहे ते न बघता तो आपल्या समाजाच प्रतीनिधित्व करत आहे हे बघून सहकार्य करावे.
त्यासाठी जळगाव मधील सर्व मराठी भाषिक संस्था, ब्राह्मण सेवा संस्था, पदाधिकारी ,जागृत समाज बांधव असे सर्व मंडळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेन्द्र फडणवीस. मा.एकनाथ राव शिंदे. मा.अजितदादा पवार मा. उद्धवजी ठाकरे. यांना भेटणार आहेत.त्यांचे सोबत त्या त्या पक्षांच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आग्रह धरला जाणार आहे.
आपल्याला आता नुसतं बोलून चालणार नाही तर आता आपण समाजासाठी एकत्र येऊन कृती करूनच संघटनात्मक कार्याची गती वाढू शकणार आहे. म्हणून राजकारणात येण्या शिवाय पर्याय नाही.अश्या राजकीय व सेवाभावी वाटचालीतूनच समाजाला बळकट करावे असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले.
येत्या महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजाने निवडणूक लढवून समाजाचे नेतृत्व करावे..ही काळाची गरज ..ब्राह्मण सभा अध्यक्ष नितीन कुळकर्णी..
RELATED ARTICLES
