जळगांव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) गुरुतत्व प्रदीप आयोजित,श्री क्षेत्र गाणगापूर येथे दि.२५/१२ /२०२५ ते ०२/ ०१/ २०२६ या कालावधी मध्ये विविध सिद्ध ग्रंथ पारायण,१००८ श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व नाम भक्ती सोहळ्यासह सव्वा लक्ष भोजन पात्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात सहभागी होण्यासाठी भव्य स्वरूपातील पालखी रथयात्रा महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातून प्रवास करीत आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी व प.पु.श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या आज्ञेने पालखी रथयात्रेचे आयोजन केले आहे. श्री क्षेत्र कारंजा (लाड) दि.२६/१०/२०२५ येथून निघून ते श्री क्षेत्र गाणगापूर २०/११/२०२५ अशी पालखी रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातून प.पु.श्री मकरंद महाराज (पिठाधिपती )श्री क्षेत्र दत्तधाम,परभणी,यांच्या मार्गदर्शना खाली प्रवास करणार आहे.
ही पालखी रथयात्रा दि.२७/१०/२०२५ सोमवारी आपल्या जळगाव शहरातील श्री गायत्री मंदिर,राधा किशन वाडी येथे सायंकाळी ५ वाजता येणार आहे. व दुसऱ्या दिवशी दि.२८/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता ही पालखी रथयात्रा पुढील प्रवासास मार्गक्रमण करणार आहे.श्री क्षेत्र गाणगापूर येथे होणारे सिद्ध ग्रंथ पारायण,१००८ श्री गुरुचरित्र सारामृत पारायण तसेच सव्वा लक्ष्य भोजन पात्र असा भव्य दिव्य कार्यक्रम देखील याच माध्यमातून सिद्धीस जाणार आहे.
लहान मोठ्या स्वरूपात भिक्षा स्वीकारली जाणार.
</strongखरेतर या पालखी रथ यात्रेच्या द्वारे श्री स्वामी महाराजांना भिक्षा वाढण्याची महत पर्वणी सर्व भाविक भक्तांना लाभणार आहे.आपण अगदी लहान ते मोठ्या स्वरूपात धान्य अथवा वस्तू स्वरूपात,रोख देणगी स्वरुपात या भिक्षा संकलन कार्यात सहभागी होवू शकतात.या रथ यात्रेच्य द्वारे श्री स्वामी महाराजांचे दर्शन,अभिषेक, पूजन ,आरती व भिक्षा इत्यादी सेवा करून श्री स्वामी महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त करून घ्यावा ,मोठ्या संख्येनं परिवारासह उपस्थिती द्यावी असे विनंती पूर्वक आवाहन विनीत श्री गुरुदेव दत्त स्वागत समिती जळगाव तर्फे करण्यात आले आहे.
