नाशिक – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
उत्तर महाराष्ट्र विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंचवटी,नाशिक येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती,पक्षाची संघटनात्मक रचना,तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक नियोजन या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात
आली.
भाजपा-उत्तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणूक नियोजन बैठक संपन्न
नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत‘भाजपा-उत्तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक’पार पडली.
सदर बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती,पक्षाची संघटनात्मक रचना,तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक नियोजन या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच,आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारसंघनिहाय नियोजन,संघटनात्मक बळकटी यावर विशेष भर देण्यात आला.पक्षाच्या प्रत्येक पातळीवरील समन्वयातून एकजुटीच्या बळावर यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत झालेला विचारविनिमय आणि मार्गदर्शन हे उत्तर महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिशा ठरवणारे ठरेल.
या बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,जलसंपदा विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,पणन मंत्री जयकुमार रावल,वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे,केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे,खा.श्रीमती स्मिताताई वाघ,आ.सुरेश दामू भोळे (राजू मामा),आ.मंगेश चव्हाण,जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
