जळगांव – दि.१० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव एन.के.टी विभागीय कार्यालय व वुमेन्स अँड चाईल्ड केअर प्लस संस्थेच्या वतीने शहरातील बळीराम पेठेतील श्री साईबाबा मंदिरात दि.१० रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत धुणे भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी माता भगिनी यांना मोफत साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी दसरा ते दिवाणी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित होत असतो.
कार्यक्रमाचे प्रारंभी श्री साई बाबांच्या चरणी मंगल वस्त्र (साडी) स्वरूपात अर्पण करण्यात आले.प्रास्ताविक जळगाव एन.के.टी जळगांव विभाग प्रमुख कमलाकर वाणी (मंत्रालय विधी मंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी ) यांनी करीत ट्रस्टच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली.तसेच शेठ नानजी भाईंच्या दानशूरतेचा परिचय करून दिला.या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
वुमेन्स अँड चाईल्ड केअर प्लस संस्थेच्या प्रमुख सौ.शांता वाणी यांनी संस्थेच्या वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या समाज हिताच्या सेवाभावी योजना व सामाजिक उपक्रमांची यांनी उपस्थित माता भगिनींना करून दिली.तसेच कष्टकरी महिलांच्या कार्याचा अभिमान असून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संस्था सदैव त्यांच्या पाठीशी राहून मदत करेल असा विश्वास व्यक्त केला.
कष्टकरी महिलांची नावनोंदणी करून त्यांना ट्रस्टचे कूपन देण्यात आले होते.कूपन सह येणाऱ्या अश्या सर्व महिलांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मोफत स्वरूपात साड्यांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ छायाचित्रकार प्रकाश जगताप,छाया पाटील,हेमलता कुळकर्णी आदींची उपस्थिती होती.संस्थेतर्फे श्री साई सेवा मंडळाचे आभार मानण्यात आले.
श्री साई बाबा मंदिरात कष्टकरी महिलांना मोफत साडी वाटप कार्यक्रम … एन. के. टी.ट्रस्ट व वुमेंस चाईल्ड केअर प्लसचा उपक्रम..
RELATED ARTICLES
