Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरशारदा वेद पाठशाळेत कोजागिरी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शारदा वेद पाठशाळेत कोजागिरी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जळगांव – दि.१० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सालाबादाप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम शारदा वेद पाठशाळेत आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्व पुरोहित व शारदा वेद पाठशाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवण्यासाठी दि.११ ऑक्टोबर २०२५ शनिवार रोजी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमासाठी ह.भ.प.श्री. मंगेश महाराज जोशी विद्यमान गादीपती, श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव,ह.भ.प.श्री.दादा महाराज जोशी चिमुकले राम मंदिर,जळगाव यांचे मंगल आशिर्वाद लाभले आहेत.

                   * विशेष उपस्थिती *
आर्कि.श्री.नितीन पारगावकर अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव,श्री.श्रीकांत खटोड संस्थापक, बहुभाषिक ब्राह्मण संघ,जळगाव श्री.अशोक वाघ संस्थापक, ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

आयोजन कर्ते अशोक साखरे गुरुजी शारदा वेद पाठशाळा आणि जळगाव पुरोहित मंडळ निमंत्रक श्री.दिपक कुलकर्णी गुरूजी,श्री दत्त सुगंधालय,जळगाव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे ठिकाण श्री समर्थ रामदास स्वामी मंदिर,महाबळ कॉलनी,जळगाव येथे सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे.

कार्यक्रम झाल्यावर दुग्धपानाची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे ठिकाण श्री समर्थ रामदास स्वामी मंदिर,महाबळ कॉलनी, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या