जळगाव – दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्राचे कर्तबगार कर्तृत्ववान मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसा निमित्त भाजपा केमिस्ट फार्मसिस्ट प्रकोष्ठ महानगर व जिल्हा केमीस्ट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताह राबवला जात आहे.त्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात मान्यवर प्रमुख अतिथी व केमिस्ट पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शीत शवपेट्यांचे लोकार्पण केमिस्ट भवनात सकाळी ११ वाजता करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख,नगरसेवक नितीन बरडे (प्रभाग क्रमांक १२),जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे उपाध्यक्ष कनकमल राका सचिव अनिल झवर, कोषाध्यक्ष शामकांत वाणी,जिल्हा केमिस्ट पदाधिकारी लखीचंद जैन,दिनेश मालू ,नरेश मंधान विलास बर्डे समीर गुळवे,विलास नेहेते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कुटुंबात मृत्यूची घटना घडल्यानंतर त्यांचे आप्तवाईक बाहेर गावावरून पोहचे पर्यंत मृतदेहाला सुस्थितीत ठेवण्यासाठी या शीत शवपेटी गरजेच्या असल्याने सामाजिक गरज लक्षात घेवून जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ यांच्या संकल्पना अनुसार हा उपक्रम राबवला जात आहे.शहरासह जवळची छोटी गावे या सेवेचा लाभ घेत आहे.
जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेने मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या राज्यव्यापी,भव्य स्वरूपातील कार्य कर्तुत्वाचा सन्मान व्हावा या हेतूने सेवा सप्ताहाचे आयोजन उत्साहात केले आहे.दि.२२ ते २८ जुलै दरम्यान विविध सामाजिक व समाज उपयोगी उपक्रमांनी हा सेवा सप्ताह जिल्हा केमीस्ट संघटनेतर्फे साजरा केला जात असल्याची माहिती भाजपा केमिस्ट फार्मसिस्ट प्रकोष्ठ महानगर ,प्रदेश सह संयोजक, जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दिली.
सेवा सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम आयोजन
दि.२२/०७/२०२५ शीतशवपेटीचे लोकार्पण केमिस्ट भवन जळगांव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दि.२२ जुलै रोजी रामानंद पोलीस स्टेशन निरीक्षक .राजेंद्र गुंजाळ,ए.पी.आय भूषण कोते यांच्या सह ,पोलिस उपनिरीक्षक शेलार,स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सचिन रन शेवरे, उप निरीक्षक संजय तडवी यांच्या उपस्थितीत रामानंद पो.स्टे.समोरील परिसरा सह जळगांव शहरातील विविध परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.दि.२४ रोजी शालेय विदयार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन सिताबाई ग. भंगाळे शाळा येथे करण्यात आले आहे.दि. २८ जुलै रोजी केमिस्ट भवनात फार्मासिस्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात प्रा.नितीन पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, दि.२६ रोजी मेमोग्राफी (महिलांसाठी स्तनरोग तपासणी),तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन त्रिमूर्ती डिस्ट्री.प्रा. लि इच्छादेवी मंदिर जळगांव येथे करण्यात आले आहे, दि.२७ रोजी रूग्णांना फळ वाटप कार्यक्रम सिव्हील हॉस्पीटल जळगांव तसेच दि. २८/०७/२०२५ बाल सुधार गृह इंडिया गॅरेज समोर, जळगांव येथे अन्नदान वाटप कार्यक्रम, वरील सर्व कार्यक्रम हे सर्व ठिकाणी सकाळी ११ वाजता हया वेळेत ठेवण्यात आले आहे.
वृक्षारोपण व शीत शवपेटी लोकार्पण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर यांच्या मार्गदर्शनाखाली विलास बर्डे(निसर्ग मित्र),महाबळ झोन प्रमुख राजेंद्र पाटील,उमेश सराफ,निलेश कुळकर्णी,दीपक चौधरी,दिनेश चौधरी,हरीश चौधरी, शिरीष बडगुजर,पद्माकर पाटील,वैभव तायडे,बाळू सोनवणे,योगेश राका,संभाजी महाले,सागर बाविस्कर ,सागर वाणी,मिलिंद पाटील,लोकेश कुळकर्णी,जयंत कुलकर्णी,चेतन महाजन,आदींनी परिश्रम घेतले.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत केमिस्ट भवनात शीत शवपेट्यांचे लोकार्पण.. भाजपा केमिस्ट फार्मसीस्ट प्रकोष्ठ आघाडी महानगर व जिल्हा केमीस्ट संघटनेतर्फे राबवला उपक्रम..
RELATED ARTICLES
