जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे १० वर्षांपासून चिमुकल्या माऊलींच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित “बोलावा विठ्ठल” हा भक्ती रसाने भरलेला कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करीत असतं. दिंडी,पालखी,दिंडीतले खेळ,आणि विठु माऊलीची भक्तिगीते असा कार्यक्रमाचे आयोजन असते.दरवर्षी या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभत असते.यावर्षी हा कार्यक्रम रविवार दि.६ जुलै २०२५ रोजी कांताई सभागृहात संपन्न होत आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी ठीक ६.३० वाजता दिंडी ने सुरू होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अनुभूती शाळेच्या संचालिका सौ.निशाभाभी जैन उपस्थित राहणार आहेत.लहान माऊलींच्या माध्यमातू सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन ऐश्वर्या परदेसी व भूषण खैरनार करीत असून तबला संगत यज्ञेश जेऊरकर करीत आहे.
दिंडीचे संगीत व नृत्य संयोजन अनुभूती शाळेचे नाना सोनवणे सर करीत आहेत.या कार्यक्रमात प्रभाकर कला संगीत अकादमी व नुपूरनृत्यांगण च्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर करणार आहेत. लहान माऊलींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी तमाम जळगावकर रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन या वतीने करण्यात आलेले आहे.
/>
चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित “बोलावा विठ्ठल”
RELATED ARTICLES