जळगांव – दि ७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) केमिस्ट भवन येथे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव महानगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर दिनांक ९ ते १४ जून दरम्यान घेण्यात येणार आहे,त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.रितेश पाटील मुख्यमंत्री सहाय्यता निधी महाराष्ट्र राज्य समन्वयक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सहकार्य म्हणून जिल्हाध्यक्ष सूनीलभाऊ भंगाळे यांनी केमिस्ट बांधवांच्या माध्यमातून गरीब व होतकरू तसेच गरजू व्यक्तींकरता आमचे केमिस्ट बांधव नक्कीच आरोग्य शिबिरात जास्तीत जास्त व्यक्तींनी फायदा घ्यावा यासाठी आवाहन करणार आहेत असे आश्वासन दिले,तसेच जनजागृतीसाठी प्रत्येक झोन प्रमुख आपल्या झोनमधील केमिस्ट बांधवांपर्यंत पॅम्प्लेट द्वारे जागृती करतील असे सांगितले.
सदरील मिटींगला जिल्हा सचिव श्री अनिल झंवर, ब्रिजेश जैन, संजय तिवारी,नरेश मंधान,जामनेर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ पाटील,तालुकाध्यक्ष समीर गुळवे, दीपक चौधरी,बाळकृष्ण सोनवणे,जामनेर पदाधिकारी व सर्व झोनप्रमुख बांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबीर यशस्वी करण्याकामी केमिस्ट भवनात मार्गदर्शन बैठक
RELATED ARTICLES