Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरकुंदकेश्वर शिव महापुराण सेवा समिती,जळगावच्या वतीने आज दू. ३ वा. भव्य कावड...

कुंदकेश्वर शिव महापुराण सेवा समिती,जळगावच्या वतीने आज दू. ३ वा. भव्य कावड यात्रेचे आयोजन..

जळगांव – दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)आज दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता श्री कालिका माता मंदिरापासून परमपूज्य गुरुवर्य पंडित प.पु.प्रदीप मिश्रा यांच्या दि.३ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान दूरदर्शन टॉवर परिसर,तरसोद हायवे येथे होणाऱ्या शिव महापुराण कथेनिमित्त कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
पुरुष/महिला सेवेकरी यांनी जास्तीत जास्त संख्येने नारंगी अथवा भगव्या रंगाच्या शर्ट,भगवा नेहरू शर्ट परिधान करून,महिलांनी भगवा अथवा नारंगी रंगाची साडी परिधान करून कावड यात्रेत सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आयोजक समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.महत्त्वाची बाब म्हणजे कावड यात्रा कुंदकेश्वर शिवालय(डी.एन सी कॉलेज परिसर) पर्यंत पोहचल्यावर तेथे सुंदरकांड कार्यक्रम संपन्न होणार आहे.कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे..शिव भक्तांनी कावड यात्रेच्या अगोदर व कावड यात्रा पोहोचल्यानंतर तेथे असलेल्या भोजन समितीस सहकार्य करावे.कामाची विभागणी करून सहकार्य करावे, उपस्थित स्वयंसेवी पुरुष वर्गाने स्वच्छता राखण्यास मदत करावी तरी मोठ्या संख्येने या कावड यात्रेत शिवभक्त तसेच धार्मिक संस्थानी सहभागी व्हावे असे आवाहन कुंदकेश्वर शिव महापुराण सेवा समिती,जळगाव.च्या वतीने कथा आयोजक सौ.ममता श्रीकांत माळी(बोढरे)यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या