Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहर२१ दत्तयाग संकल्पपूर्ती निमित्त जळगावात त्रिपदी परिवारातर्फे महापूजा संपन्न

२१ दत्तयाग संकल्पपूर्ती निमित्त जळगावात त्रिपदी परिवारातर्फे महापूजा संपन्न

जळगाव – दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) अखिल भारतीय त्रिपदी परिवार जळगाव शाखेतर्फे आज शाहुनगरमध्ये २१ दत्त याग संकल्पपूर्ती निमित्त दत्तयाग महापूजा करण्यात आली.समारोप कार्यक्रमात प.पू.चिदानंद अवधूत डाॅ.बाबासाहेब तराणेकर यांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा असंख्य शिष्यजनांनी लाभ घेतला.सकाळी गणेश पूजन, कलश पूजन व पादुका पूजनानंतर सत्यदत्त पूजा करण्यात आली. अग्निपूजनानंतर यजमान आलाप राजेंद्र कुलकर्णी यांनी सपत्नीक यज्ञकुंड व हवन सामग्रीचे पूजन केले. उपस्थित सर्वांच्या हस्ते यज्ञात पूर्णाहुती अर्पण करण्यात आली. दीपक कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. अव्ययान एवेन्यू (दत्त कॉलनी) येथे ही महापूजा संपन्न झाली.यावेळी प. पू. चिदानंद अवधूत बाबा महाराज तराणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
त्यांचे आगमनवेळी सौ. कविता सोनवणे, योगिनी नांदेडकर, हर्षदा कुलकर्णी, कल्पना नेवे व पूनम नेवे या सुहासिनींनी त्यांचे औक्षण करून पाद्यपूजन केले. तर शिष्यजणांनी फुले – पाकळ्या उधळत स्वागत केले. यानंतर 21 यज्ञकर्ते यजमानांचा बाबा महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दत्तबावनी, गुरुचरित्र सार पठनानंतर महाआरतीने दत्तयागाची सांगता करण्यात आली. राजेंद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजिलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल तारे, किशोरबापू वाघ, प्रदीप सोनवणे यांच्यासह सर्व गुरुबंधूंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी केले.
(छायाचित्र: – त्रिपदी परिवारातर्फे शाहुनगरमधे आयोजित दत्तयागप्रसंगी यज्ञात पूर्णाहुती टाकताना यजमान व भक्तजन)

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या