Monday, July 7, 2025
Homeजळगांव शहरसौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल येथे आषाढी एकादशी साजरी.

सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल येथे आषाढी एकादशी साजरी.

जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल व शिशु विकास मंदीर, जळगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई तसेच विविध संताची वेशभूषा केली.या प्रसंगी शाळेच्या समन्वयिका सौ. लताताई छापे‌कर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे यांच्या हस्ते पालखीचे पूजन व विठठूलाची आरती करण्यात आली. त्या नंतर विद्यार्थ्यांची दिंडी व रिंगण सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद पालक शिक्षकेतर कर्मचारी व सेवक कर्ग यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या