Tuesday, October 7, 2025
Homeजळगांव शहरसुश्राव्य व्हायोलीन वादनाने संगीत महोत्सवाची सांगता..

सुश्राव्य व्हायोलीन वादनाने संगीत महोत्सवाची सांगता..

जळगाव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
श्री साईबाबा मंदिर बळीराम पेठ येथे ७१ व्या साई बाबा पुण्यतिथी निमित्त पंधरा दिवसीय सांगीतिक महोत्सवाची सांगता शनिवारी सौ.स्वरा योगेश पाठक जळगाव यांच्या सुश्राव्य व्हायोलीन वादनाने झाली.राग श्यामकल्याण मधील विलंबित,मध्य व दृत लयीतील रचना अत्यन्त तयारीने स्वरा ताईंनी वाजविल्या.राग कल्याण व कामोदचे मिश्रण असलेला हा प्रसन्न राग त्यांनी रसिकांना भावेल अशा पद्धतीने पेश केला.त्यानंतर त्यांनी मिश्र धून,तसेच अबीर गुलाल,पायोजी मैंने,साईनाथ तेरे हजारों हाथ ,आई भवानी तुझ्या कृपेने…अशी विविध भक्तीरसपूर्ण गीते व्हायोलिनवर वाजवून रसिकांची दाद मिळवली.त्यांना तबल्यावर श्री दिलीप चौधरी यांनी तर संजय पिले यांनी टाळ वाजवून उत्तम साथसंगत केली.कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन हर्षा पाठक यांनी केले.साई सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कलाकारांना यथोचित सन्मानित केले.कार्यक्रमाला रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या