Monday, July 7, 2025
Homeजळगांव शहरसुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळा तर्फे विठ्ठलाच्या दिंडीचा सोहळा..

सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळा तर्फे विठ्ठलाच्या दिंडीचा सोहळा..


जळगांव- दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
आषाढी एकादशी निमित्त. सगळीकडे विठ्ठलाच्या वारीचे वातावरण आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला पायी वारीने वारकरी निघाले आहेत.
सर्वांनाच ते शक्य नसते. म्हणून सुरभी महिला मंडळ व सिद्धिविनायक महिला मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने दि ५ जुलै शनिवार रोजी संध्या ५.वा. रेल्वेकॉलनीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातून दिंडीला सुरवात करून तिथेच अगोदर विठ्ठलाच्या पालखीची पूजा, करून नंतर आरती व प्रसाद वाटून समारोप करण्यात आला.
सुरवातीला सौ अविता जोशी ह्यांनी शंखनाद करत दिंडीला सुरवात करण्यात आली.
माजी महापौर मा सौ सिमाताई भोळे, सुरभीच्या अध्यक्ष सौ स्वाती कुळकर्णी व सिद्धिविनायक मंडळाच्या अध्यक्षा सौ शारदा चौधरी ह्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखी चे पूजन करून दिंडीला सुरवात करण्यात आली.
दिंडी मध्ये महिलां पारंपरिक वेशभूषा करून , टाळ, तुळशी वृंदावन, केशरी ध्वज सोबत , घेऊन भजन म्हणत महिला सहभागी झाल्या. तसेच लहान मुल सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून वारीत सहभागी झाले.ह्यावेळी फुगड्या खेळत, पावली खेळत , जय हरी विठ्ठल चा जयघोष करीत महिलांनी आनंद घेतला.सुरभी मंगळागौर ग्रुप व श्री सिद्धिविनायक महिला मंडळ ग्रुपने विठ्ठलाच्या गाण्यावर व गवळणीवर नृत्याचे सादरीकरण केले. विशेषतः ज्येष्ठ महिलांचे सादरीकरण कौतुकास्पद होते.सुरभी चे सभासद, सिद्धिविनायक मंडळातील महिला, मानसी जोशी, सुनीता सातपुते व सौ भारती राव तसेच श्री रुपेश झवर ह्यांचे सहकार्य लाभले.आरती व प्रसादाने दिंडीची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या