जळगांव – दि.८(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळाची कोजागिरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये घेण्यात आली.
सुरवातीला अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी,मानसी जोशी, ह्यांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीसुक्त आवर्तन घेण्यात आले. कोजागिरीच्या प्रसन्न वातावरणात सौ मृदुला कुळकर्णी ह्यांच्या सुमधुर गाण्याला उपस्थितांनी दाद दिली.
नंतर अंताक्षरी कार्यक्रम घेण्यात आला. अंताक्षरी कर्यक्रमात विजेत्या स्पर्धकांची नावे
प्रथम निशा गट – सौ अनुप्रिता बापट व सौ मालती चौक द्वितीय यामिनी गट – सौ स्वाती टेनी व सौ. प्रार्थना महाजन तृतीय रजनी गट – सौ स्वप्नगंधा जोशी व सौ अश्विनी जोशी,सरप्राईझ बक्षीस विजेते, रंजना मुळे मृदुला कुळकर्णी,अनघा दाणी,प्रज्ञा जोशी,वैदेही नाखरे,सौ.अविता जोशी ह्यांनी स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन केले.
ह्यावेळी स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले. सौ स्मिता शुक्ल, सौ संध्या कौल व सौ अश्विनी जोशी ह्यांनी पर्यावरणावर भुलाबाईची व कृष्णाची गाणी गायली.संपदा छापेकर ह्यांच्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आता.
कार्यक्रमासाठी ज्योती भोकरडोळे, सौ अश्विनी जोशी,सौ मेघा नाईक,सुनीता सातपुते, सौ आशा जोशी, सौ स्मिता बंगाली, सौ स्मिता शुक्ल, सौ रेवती शेंदुर्णीकर, सौ प्रज्ञा जोशी, सौ प्रतीक्षा शुक्ल तसेच ज्येष्ठ नागरिक संघ व श्री देवेंद्र मोरदे , सौ चैताली मोरदे ह्यांनी सहकार्य केले.
