जळगांव – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क ) शहरातील महापालिका निवडणुकी बाबत ब्राह्मण समाजातील बांधव वर्गावर उमेदवारी बाबत झालेल्या अन्याया संदर्भात विचार विनिमय करून पुढील भूमिका घेण्या संदर्भात चिंतन बैठक काल दि.३१ रोजी सायंकाळी ७ वाजता ब्राह्मण सभा अध्यक्ष नितीन कुळकर्णी यांच्या सामाजिक आवाहना नुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस ब्राह्मण समाजातील विविध सामाजिक ,धार्मिक संघटनात्मक संस्था प्रमुख व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत यंदाच्या महापालिका निवडणूक प्रक्रियेत ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व न मिळू शकल्याने त्याची कारण मिमांसा तसेच असे का घडले ? नेहमी गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांची भूमिका,समाजातील बांधवांची या बाबतची भावना या विचार विनिमय चर्चेत जाणून घेण्यात आली.त्यानंतर आता पुढे या बाबत काय सावध भूमिका समाजाने घ्यावी या बाबत यथोचित मार्गदर्शन करण्यात आले.ब्राह्मण समाज अपक्ष उमेदवारांच्या प्रतिक्रया त्यांच्या मनोगत माध्यमातून जाणून घेण्यात आल्या तसेच समाजातील बांधवांनी अपक्ष म्हणून दाखला केलेल्या उमेदवारांना पाठबळ देवून त्यांच्या प्रभागात प्रचार कार्यात सहभागी होवून खंबीरतेने साथ देण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला.
तसेच उद्या दि.२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ब्राह्मण सभेत आयोजित पुढील समाज बांधवांच्या दृष्टीने महत्वपूर्ण चिंतन व मार्गदर्शन बैठकीत सर्वानुमते अंतिम निर्णयावर शिक्का मोर्तब केले जाणार आहे .व तो एकमताने केलेला निर्णय ती घोषणा प्रसिद्धीला दिली जाणार आहे.तरी संबंधित संस्था प्रमुख,पदाधिकारी,ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थिती देवून सहभागी व्हावे असे आवाहन ब्राह्मण सभा व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने ब्राह्मण सभा अध्यक्ष नितीन कुळकर्णी यांनी धर्मसाथी लाईव्ह न्यूज बोलताना दिली.
