जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दि.१५,रविवार रोजी,दरवर्षीप्रमाणे “महाशिवरात्री” निमित्त श्री साई सेवा मंडळ,बळीराम पेठ जळगाव. संचलित श्री साईबाबा मंदिर येथे”श्री साईंचे मेघस्नान” हा सोहळा आयोजित केलेला आहे.
सकाळी ७ वाजता ‘मेघस्नान” व सोबतच ‘महादेवांच्या पिंडीचा अभिषेक’संपन्न होणार आहे. मागील वर्षी ३८ जोडप्यांनी सोबत मिळून हा सोहळा संपन्न केला होता.यावर्षी याहीपेक्षा जास्त जोडप्यांनी सहभागी होऊन या पवित्र क्षणाचे साक्षीदार व्हावे हा मानस आहे.
आपले नाव व मोबाईल नंबर खालील नंबर वर कळवावे,जेणेकरून नियोजनास सोपे होईल. कार्यक्रमास पारंपारिक ड्रेस( वस्त्र) परीघान करावे. संपर्कासाठी नंबर श्री.वीरेंद्र मोदे, 9422224204 ,श्री.आशिष जोग 7020213694 श्री.मनोज दलाल 8421919144,श्री.रवी हसवाल 7767949333,श्री नितीन सोनवणे 9921122728 कार्यक्रमाचे ठिकाण:-श्री साई बाबा मंदिर, बळीराम पेठ,रेल्वे लाईनजवळ,जळगाव.येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिरा तर्फे करण्यात आले आहे.
श्री साई बाबा मंदिर येथे उद्या दि.१५ रोजी “श्री साईंचे मेघस्नान सोहळा..
RELATED ARTICLES
