जळगांव- दि.२३(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे संस्थानचे वतीने श्री संत मुक्ताबाईंची ७२८ वी(तिरोभूत)(पुण्यतिथी)वैशाख वद्य दशमी गुरुवार २२ मे २०२५ या दिनी साजरी करण्यात आली.श्रीराम मंदिरात पहाटे ५ ते ७.३० काकडा भजन,काकड आरती,श्री सद्गुरू आप्पा महाराजांना श्री प्राप्त झालेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताईंच्या प्रासादिक पादुकांना तापी,गिरणा व नर्मदा नदीच्या पवित्र जलाने श्रीसुक्त या स्तोत्र पठणा द्वारे श्रीराम मंदिराचे उत्तराधिकारी वे.ह.भ.प.श्रीराम महाराजांच्या शुभ हस्ते अभिषेक,मंगलारती करण्यात आली.
तसेच मेहरूण शिवरातील शिवाजी उद्याना लगत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री सद्गुरू आप्पा महाराजांना आदिशक्ती श्री संत मुक्ताई दृष्टांत स्थळ श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे सकाळी 9 ते 10 वाजता संस्थानचे विद्यमान पंचम गादीपती व श्री सद्गुरु आप्पा महाराजांचे वंशज ह.भ.प. श्री. मंगेश महाराज यांचे शुभहस्ते श्रीसंत मुक्ताई पादुका पूजन,अभिषेक तसेच पंढरपूर पायी वारी पत्र टपाल पूजन होवून सकाळी 10.15 वाजता वारकरी सांप्रदायीक ह.भ.प.श्री श्रीधर महाराज जळगावकर यांचे श्री संत तुकाराम महाराजांच्या काय सांगू आता संताचे उपकार या अभंगवर हरीकीर्तन झाले.
पुजनाचे पौरोहित्य श्री नंदु शुक्ल गुरुजी यांनी केले. दि.१६ ते २२ मे श्री न्यानेश्वरी ग्रंथ पारायण ह.भ.प. श्री अशोक महाराज शिंपी यांनी केले.कीर्तनासाठी मेहरूण,जळगाव, शिरसोली, हरीविठ्ठलनगर , मोहाडी,खेडी,पिंप्राळा, निमखेडी, आदी परिसरातील भाविक,वारकरी, भक्त शिष्य मंडळी उपस्थित होते. पखवाज वादनाची साथ ह.भ.प. श्री पंकज पाटील यांनी केली सखाराम महाराज, निंबा जगताप, संभाजी पाटील, माऊली टेलर, रघुनाथ भाऊ कोळी, रतन माळी, शंकर भाऊ धनगर,अजय व संजय – दिलीप लाडवंजारी ,कारभारी गव्हाणे, बाळू कोळी,मिराबाई,विकास सुतार,फडे गुरुजी,सिद्धेश्वर जोशी,विजयकासार,त्यानंतर संध्याकाळी रामपेठेतील श्रीराम मंदिरात संध्याकाळी ५ वाजता हरिपाठ,श्रीरामरक्षा स्तोत्र पठण धुपारती होऊन वैकुंठवासी ह.भ.प. पुष्पाईंच्या चतुर्थ मासिक पुण्यतिथी निमित्त संध्याकाळी 6.30 वा जळगावातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु.संस्कृती पवनीकर यांची कीर्तन सेवा झाली.त्यांना हार्मोनियम साथ सौ.स्वरा पाठक तर तबला साथ श्रीधर जोशी यांनी केली. कार्तिकी पाठक,अनुजा कुळकर्णी, भक्ति कुळकर्णी या बाल कलाकार साथ संगत लाभली
यावेळी जळगावातील विविध भागातील भाविकांनी श्रवणाचा लाभ घेतला कार्यक्रमासाठी खंडू तांबट,बापू सोनार,दिलीप कोळी,जानकीराम भोई,किरण गोसावी, अनिल कोळी,साकेत पाटील,कल्पेश कुळकर्णी,तुषार कुळकर्णी,कृष्णा शिंदे,सुनील शिंपी,दत्तू भाऊ,तेली, आदींनी सेवा केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद काका धर्माधिकारी यांनी केल.
श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिरात व श्रीराम मंदिर संस्थानात श्री संत मुक्ताबाई ७२८ वा. तीरोभूत सोहळा संपन्न..
RELATED ARTICLES
